IRCTC : खास ऑफर स्वस्तात ५ ज्योतिर्लिंगांचे दर्शन! यात शिर्डी आणि शनी शिंगणापुरचाही समावेश

भारत गौरव स्पेशल पर्यटक ट्रेन : ही ट्रेन २० मे २०२३ रोजी कोलकाता येथून सुरू होईल. ही ट्रेन ओंकारेश्वर, महाकालेश्वर, सोमनाथ, नागेश्वर आणि त्र्यंबकेश्वर या पाच ज्योतिर्लिंगांचे दर्शन देईल. या ट्रेनने तुम्ही शिर्डी साई बाबा आणि शनी शिंगनापूरचेही दर्शन घेऊ शकाल. यासोबतच तुम्ही स्टॅच्यू ऑफ यूनिटीही पाहू शकता. कोलकातापासून तुम्ही प्रवास सुरु करु शकता. १२ दिवस आणि ११ रात्रीचा हा टूर आहे.
या स्टेशनवर मिळेल बोर्डिंग/ डिबोर्डिंग सुविधा : बंदेल, बर्धमान, बोलपूर, शांतिनिकेतन, रामपूर हाट, पाकूर, साहिबगंज, कहालगाव, भागलपूर, जमालपूर, किउल, बरौनी, समस्तीपूर, मुझफ्फरपूर, हाजीपूर, पाटलीपुत्र, आराह, बक्सर, पं. दीनदयाळ उपाध्याय जं. आणि प्रयागराज छेओकी स्टेशन.
भाडं किती लागणार : या ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी इकॉनॉमी क्लास (स्लीपर क्लास) वर ३१५ बर्थ उपलब्ध आहेत. यामध्ये प्रति व्यक्ती २०,०६० रुपये भाडं असेल. नॉन एसी बजेट हॉटेलमध्ये थांबवण्याची व्यवस्था मिळेल. नॉन एसी बसची सुविधाही मिळेल. स्टँडर्ड म्हणजेच 3rd AC साठी २९७ बर्थ उपलब्ध आहेत.यामध्ये प्रति व्यक्ती ३१,८०० रुपये भाडं आहे. एसी हॉटेलमध्ये थांबण्याची व्यवस्था केली जाईल. नॉन-एसी बसची सुविधा मिळेल. कंफर्ट (2nd AC) साठी ४४ बर्थ उपलब्ध आहेत. प्रति व्यक्ति ४१,६०० रुपये भाडं आहे. एसी हॉटेलमध्ये थांबवलं जाईल आणि एसी बसची सुविधाही दिली जाईल. या सर्व पॅकेजची सुविधाही अजुनही सुरु आहे. बुकिंग सुविधा आयआरसीटीसीची अधिकृत वेबसाइट www.irctctourism.com वरही उपलब्ध आहे.



