गुन्हेभारत

अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्येप्रकरणी अखेर गायक समर सिंहला अटक

गाझियाबाद – भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेला गायक-अभिनेता समर सिंह उर्फ समरजीत याला अखेर पोलिसांनी पकडले आहे. त्याला गुरुवारी रात्री उशिरा गाझियाबादच्या नंदग्राम पोलिस स्टेशन हद्दीतील राजनगर एक्‍स्टेंशनच्या चार्म्स क्रिस्टल सोसायटीमधील फ्लॅटमधून अटक करण्यात आली. वाराणसी आयुक्तालयाच्या पोलिसांनी शुक्रवारी गाझियाबाद न्यायालयात आझमगडमधील मेहनगर येथील रहिवासी समरला हजर करून ट्रान्झिट रिमांडची मागणी केली. रिमांड मिळाल्यानंतर पोलीसांनी त्याला रस्त्याने वाराणसीला आणले.

या प्रकरणातील आणखी एक आरोपी संजय सिंह याचा शोध सुरू आहे, जो आझमगडमधील बिलरियागंज भागातील गद्दोपूर गावचा रहिवासी आहे. पोलिसांकडून सातत्याने छापेमारी सुरू आहे. मार्च रोजी सकाळी आकांक्षा दुबे हिचा मृतदेह सारनाथ भागातील एका हॉटेलच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळला होता.

भोजपुरी चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने ती वाराणसीला आली होती. या प्रकरणी मृत अभिनेत्रीची आई मधु दुबे यांनी भोजपुरी गायक आणि अभिनेता समर सिंह आणि त्याचा मित्र संजय सिंह यांच्याविरुद्ध सारनाथ पोलिस ठाण्यात २७ मार्च रोजी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button