हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे यांची आईसाठी भावूक पोस्ट..

मराठी टीव्ही मनोरंजन विश्वात महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं आहे. अनेक वर्षांपासून हास्यजत्रेनं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे.
त्यातील कलाकारांसोबत प्रेक्षकांचे एक भावनिक नाते तयार केले आहे. आता या मालिकेतील एक प्रसिद्ध कलाकार प्रभाकर मोरे. प्रभाकर मोरे यांच्या चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. त्यांच्या स्किट मधील त्यांचे शालू… हे गाणे जवळपास जगभरात प्रसिद्ध झाले आहे.
‘कोकणचे पारसमणी’ म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा प्रभाकर मोरे यांनी सोशल मीडियावर आपल्या आईसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यांच्या या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
प्रभाकर मोरे यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आईचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी आईप्रती आपल्या भावना देखील व्यक्त केली आहेत. या पोस्ट मध्ये प्रभाकर मोर लिहितात की, ”आईसाठी दिवस नसतो तर आयुष्याचा प्रत्येक दिवसच आईमुळे असतो.”
त्यांनी लिहिलेला हा खास संदेश सगळ्यांचेच लक्ष वेधून गेला आहे. यावरून त्यांचे आणि त्यांच्या आईमधील जिव्हाळ्याचं नातं दिसून येतं. आहे. प्रभाकर मोरे यांच्या या पोस्टची सध्या बरीच चर्चा आहे.
उदया १४ मे रोजी जागतिक मातृ दिन म्हणजेच ‘वर्ल्ड मदर्स डे’ आहे. या निमित्ताने सर्वजन आवर्जून आईविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करतात. यामध्ये कलाकार मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर आपल्या आईविषयी लिहितात, फोटो शेयर करतात. अशीच एक पोस्ट प्रभाकर मोरे यांनी शेयर केली आहे.
प्रभाकर हे मूळचे रत्नागिरीतील आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते मनोरंजन विश्वात कार्यरत असून एक उत्तम कसलेला विनोदी अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.



