गुन्हे

मावळमध्ये “मुळशी पॅटर्न” जनसेवा विकास समिती अध्यक्ष किशोर आवारे यांची भरदिवसा हत्या

पुणे गुन्हे वार्ता : पुण्यातील मावळमध्ये भर दिवसा मुळशी पॅटर्नचा थरारक घटना पाहण्यास मिळाली. मावळमधील तळेगावमध्ये जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांची हत्या करण्यात आली.

चेहऱ्यावरच कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात आवारे यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरपरिषद कार्यालासमोरच ही धक्कादायक घटना घडलेली आहे.

जनसेवा विकास समितीचे किशोर आवारे हे नगरपरिषदेच्या कार्यालयातून बाहेर आले. त्यावेळी तिथेच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी आवारे यांच्यावर हल्ला केला. कोयत्याने त्यांच्यावर वार करण्यात आले. घटनास्थळावर गोळीबार ही झाल्याचं बोललं जातंय.

आवारे हे जनसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष आहेत. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. पण डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. आवारे यांच्यावर नेमका कोणी आणि का हल्ला केला, हे अद्याप समजू शकलेलं नाही.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

  मावळ मधील तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांची आज दुपारी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या इमारतीमध्ये निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ४ अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि कोयत्याने डोक्यात गंभीर वार केले.

या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेले आवारे यांनी सोमाटणे फाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले. सोमटणे येथील टोल नाक्याचा विषय त्यांनी मागील काही दिवसांपासून लावून धरला होता. चुकीच्या पद्धतीने हा टोलनाका सोमाटणे गावाच्या हद्दीत उभारण्यात आला असून तो बेकायदेशीर टोलनाका हटवा या मागणीसाठी त्यांनी आंदोलन देखील केले होते. मात्र हत्येमागील कारण नेमकं काय आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button