घरातील या गोष्टीपासून बनवा आयुर्वेदिक तेल; दिसेल ४ ते ५ दिवसात फायदा

बदलेल्या जीवनशैलीमुळे आज अनेकजण लहान वयात केस पांढरे होणे, पातळ होणे आणि तुटणे किंवा टाळू दिसणे इत्यादी समस्यांमधून जात आहोत. लांब घनदाट केस सौंदर्यामध्ये भर घालतात. केसांमुळे तुमचा लुक पूर्णपणे बदलून जातो. त्यामुळे अनेक जण केसांवर अनेक उपचार करतात.पण अनेकांना खूप खर्च करून देखील काही फरक येत नाही.
यासाठीच आयुर्वेदिक डॉक्टर रॉबिन शर्मा काही उपाय सांगितले आहेत त्यांच्या मते बाजारात उपलब्ध असलेल्या तेलांमुळे फसवणूक न करण्याचा सल्ला दिला आहे. बाजारातील उत्पादने महाग असतात त्याचप्रमाणे त्यात भरपूर रसायने असतात त्यामुळे केसांचे नुकसान होते. यासाठी त्यांनी घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून तेल तयार केले आहे. या तयार तेलाने डोक्याची मालिश सुरू करा. डॉक्टरांच्या मते, तुम्हाला ४ ते ५ दिवसात परिणाम दिसू लागतील. हे हर्बल किंवा नैसर्गिक केसांचे तेल कसे बनवायचे ते जाणून घ्या.
- आवळा
- कढीपत्ता
- कलोंजी
- यष्टिमधु
- ब्राह्मी
- भृंगराज
- मेथी
- तीळाचे तेल
- हे तेल लावल्याने काय फायदा होतो : या तेलामुळे केसांची वाढ खुंटते. यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केस पुन्हा वाढतात . एवढेच नाही तर तुमचे केस फाटले असतील त्याचप्रमाणे निर्जीव दिसत असतील तर हे तेल त्यांना ठीक करेल आणि त्यांना पुन्हा फुटू देणार नाही. त्याचप्रमाणे नवीन येणारे केसांची झपाट्याने वाढ करेल.
- असे तयार करा तेल : सर्व साहित्य थोडं थोडं थोडं घ्या आणि त्या प्रमाणात बारीक करा आणि काचेच्या बरणीत ठेवा. त्यानंतर त्यामध्ये तिळाचे तेल इतके टाकावे की या सर्व गोष्टी पूर्णपणे विरघळतील. ही बाटली 5 ते 7 दिवस उन्हात ठेवा, जेणेकरून त्यातील सर्व गुणधर्म तेलात शोषले जातील. अशा प्रकारे घरगुती केसांचे तेल तयार होईल. हे तेल तुम्ही वर्षभर वापरू शकता.



