या ३ ट्रिक्स वापरून सोडवू शकता चहा पिण्याची सवय

आरोग्य : अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहा पिऊन होत असते. चहा प्यायले नाही तर अनेकांना फ्रेश वाटतं नाही आणि त्यांचा संपूर्ण दिवस हा रटाळ जातो असे म्हणतात. परंतु काहीजण दिवसभरात चहाचे सेवन प्रमाणापेक्षा जास्त करतात आणि यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो. परंतु चहा प्रेमी लोकांनी जरी चहा पिण्याची सवय मोडायचे ठरवले तरी ते सहज शक्य होत नाही. तेव्हा चहा पिण्याची सवय कशी मोडायची आणि असे केल्याने शरीरात कोणते बदल होतात, हे जाणून घेऊयात.
अचानक कोणतीही वस्तू खाणं किंवा पिणं बंद केलं तर शरीराचं नुकसान होऊ शकतं. यामुळे डोकेदुखी, थकवा, मूड स्विंग यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. तेव्हा तुम्हाला चहा पिण्याची सवय सोडायची असेल तर तुम्ही हळहळू चहा पिणे कमी करा. म्हणजे जर तुम्हाला दररोज ३ ते ४ वेळा चहा पिण्याची सवय असेल तर तुम्ही २ कप चहा पिया आणि हळूहळू याचे प्रमाण कमी करा. चहाची सवय मोडणं कठीण वाटत असेल तर तुम्ही दुधाच्या चहाला पर्याय म्हणून हर्बल टी, हेल्दी टी, इत्यादींचे सेवन करू शकता.
हर्बल टी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक घटक असतात, ज्यामुळे तुमच्या शरीराला देखील फायदा होतो आणि तुम्ही चहाची सवय मोडू शकता. अनेकांना दुपारी चहा पिण्याची सवय असते. अशावेळी तुम्ही चहा ऐवजी ज्यूस पियू शकता. ज्यामुळे तुमच्या पचन संस्थेचा समतोल राखला जातो.
ब्लड प्रेशर नियंत्रणात राहत : चहाच्या सेवनान ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता असते. तेव्हा जर तुम्ही चहा किंवा कॉफी पिणे सोडले तर तुमचे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहू शकतो.
चांगली झोप मिळते : चहा सोडल्यामुळे आहारात कॅफिनच प्रमाण कमी होत ज्यामुळे चांगली झोप लागते. कारण कॅफेनयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने झोप न लागण्याचा त्रास होतो.
दातांचे आरोग्य चांगले रहाते : चहा कॉफी सारख्या पदार्थाचे वारंवार सेवन केल्याने दातांचे आरोग्य बिघडते. यामुळे दात कमकुवत होतात आणि त्यांच्या रंगावर देखील परिणाम होतो. कॅफेनयुक्त पेयांमुळे दातांच्या इनॅमलचं नुकसान होतं याशिवाय दातांमध्ये झिनझिण्याही येतात. तेव्हा जर तुम्ही चहा पिणे सोडले तर तुमच्या दातांचे आरोग्य चांगले राहील आणि दात देखील चमकदार दिसतील.



