गुन्हे

NIA ने मोस्ट वॉन्टेड जाहीर केलेले आरोपी पुणे पोलीसांनी केले जेरबंद

पुणे गुन्हेवार्ता : राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने मोस्ट वॉन्टेड जाहीर केलेले आरोपी ज्याच्यावर ५ लखाचे बक्षीस घोषित आहे. असा आरोपी कोथरूड परिसर पोलिस पेट्रोलिंग पथक यांच्या कडून अटक करण्यात आली आहे.

कोथरूड येथे पोलिस पेट्रोलिंग पथक प्रदीप चव्हाण आणि अमोल नाझन हे पेट्रोलिंग करते वेळी ३ आरोपी दुचाकी चोर पकड़ले. ह्या चोरानी आजवर चोरी केलेला मुद्देमाल रिकवर करण्यासाठी ह्या तीन आरोपीना ते राहत असलेल्या ठिकाणी नेण्यात आले. त्या वेळी तिनी आरोपी पळून जान्याचा प्रयत्न करू लागले १ आरोपी पळून जण्यात सफल झाला आहे तर २ आरोपी नामे इमरान शेख आणि मोहमद यूनुस साकी यांना पकड़ण्यात पुलिसांना यश आले आहे. आरोपीच्या घराची झड़ती घेतली असता घरातून एक जिवंत राउंड आणि ४ मोबाईल व लैपटॉप जप्त करण्यात आला आहे. पुलिस तपासात हे आरोपी NIA च्या लिस्ट वरील गुन्हेगार आहेत याच्यावर NIA कडून ५ लाखाचे बक्षीस घोषित आहे असे आरोपी आता पुणे पुलिसांच्या ताब्यात आहे. ही माहिती पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button