महाराष्ट्र

शीव पनवेल मार्गावर टँकर उलटला, अ‍ॅसिडसदृश्य वायूची गळती

नवी मुंबई : शीव पनवेल मार्गावर आज सकाळी साडेसहाच्या सुमारास पुण्याच्या दिशेने जाणारा टँकर उलटला. बेलापूर खिंड उड्डाणपुलावरून मार्गस्त व्हावे की खालून जावे असा गोंधळ वाहन चालकाचा उडाला आणि त्यामुळे त्याने उड्डाणपुलाच्या कठड्याला जोरदार धडक दिली आणि टँकर उलटला.

आज सकाळी साडेसहाच्या सुमारास मुंबईकडून पुण्याच्या दिशेने एक टँकर जात होता. टँकर शीव पनवेल महामार्गावरील बेलापूर खिंड येथील उड्डाणपूल नजीक आला, त्यावेळी उड्डाणपुलावरून जावे की त्या खालून जावे, असा वाहन चालकाच्या मनाचा गोंधळ उडाला. त्यात टँकरने उड्डाणपूल जेथून सुरू होतो त्या कठड्याला जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की टँकर उलटला. यात कोणी जखमी झाले नाही, मात्र टँकरमधून अ‍ॅसिडसदृश्य द्रव पदार्थाची गळती सुरू झाली.  त्यातून धूर आणि उग्र वास येत होता. त्यामुळे काही वेळ वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र उड्डाणपुलावरून जाणारी वाहतूक सुरळीत असल्याने फार मोठी वाहतूक कोंडी झाली नाही.

सद्य:स्थितीत वायू गळतीवर नियंत्रण मिळवले असून उड्डाणपुलाखालील एक मार्गिका सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांनी दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button