महाराष्ट्र

तुर्भे स्टोर उड्डाणपुल कालावधी संपण्याच्या मार्गावर, काम कधी होणार पूर्ण ? नागरिकांचा सवाल

नवी मुंबई : मागील कित्येक वर्षांपासून बहूचर्चित असा रखडलेल्या तुर्भे स्टोर येथील उड्डाणपूलाचा मार्ग मोकळा झाला असला तरी काम करण्याचे आदेश निघून ही उड्डाणपूलचे काम सुरूनाही. कार्यादेशाचा कालावधी संपण्याच्या मार्गावर आला तरी अद्याप प्रत्येक्षात कामाला सुरुवात करण्यात आली नाही. त्यामुळे हा उड्डाणपूल कधी होणार याकडे नागरिकांचे लक्ष आहे.

तुर्भे नाका येथील वाढलेल्या वाहतुकीमुळे होणारी वाहतूक कोंडी व त्या ठिकाणी होणारे अपघात त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याची नागरिकांतून वारंवार मागणी होती. ठाणे बेलापूर मार्गावरील तुर्भे स्टोर येथील महामार्गावर नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी पर्याय उपलब्ध नसल्याने त्याठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडत होते. आतापर्यंत याठिकाणी अनेकांना जीव गमवावा लागला असून नागरिक जखमी झाले होते. त्यामुळे याठिकाणी उड्डाणपूल किंवा पादचारी पुलाची मागणी करण्यात येत होती. महापालिकेने सन २०१६ साली याठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २०२०मध्ये महापालिका सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. मात्र वारंवार निविदा रद्द केल्या जात असल्याने हे काम रखडले होते. मात्र अखेर आता पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबवून कार्यादेश मे. महावीर इन्फ्रां या कंपनीस २६ एप्रिल २०२२ रोजी देण्यात आला आहे.

यासाठी३० कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कामासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून २५ ऑक्टोबर २०२३ रोजी या कामाची मुदत संपत आहे. दिलेला कलावधी संपुष्टात येण्यासाठी अवघे तीन महिन्यांचा कालावधी बाकी आहे,मात्र तरीदेखील उड्डाणपुलाच्या कामाला प्रत्येक्षात सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा उड्डाणपूल कधी सुरू होणार असा प्रश्न रहिवाशांमधून उपस्थित केला जात आहे.

तुर्भे उड्डाण पुलाच्या कामासाठी वाहतूकित बदल करावे लागणार आहेत. त्यासाठी वाहतूक विभागाची ना हरकत मिळणे आवश्यक असून त्याकरिता वाहतूक विभागाला पत्र देण्यात आले आहे. येत्या ८ ते १० दिवसांत ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त होणार असून , लवकरच कामाला सुरुवात होईल.-संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महानगर पालिका.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button