राजकारण

अजितदादांनी केला मेट्रोने प्रवास, प्रवाशांशी साधला संवाद

पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाण पुलाच्या लोकार्पण सोहोळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार असून त्यापूर्वी त्यांनी रुबी हॉल क्लिनिक ते वनाजपर्यंत मेट्रोने प्रवास केला. यावेळी त्यांनी प्रवाशांसोबत संवाददेखील साधला.

पुणे शहराचे पश्चिमद्वार म्हणून चांदणी चौकाची ओळख आहे. त्या चौकामध्ये प्रवाशांना अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. त्या वाहतूक कोंडीमधून प्रवाशांची सुटका करण्यासाठी सुसज्ज असा रस्ता आणि उड्डाण पुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या कार्यक्रमापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील प्रास्तावित मेट्रोसह दुमजली उड्डाणपुलाच्या कामाबाबत अजित पवार यांनी पुणे स्टेशन येथील विधान भवन येथे अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. त्या बैठकीनंतर चांदणी चौकातील कार्यक्रमाच्या ठिकाणी अजित पवार यांनी रुबी हॉल क्लिनिक ते वनाजपर्यंत मेट्रोने प्रवास केला. या प्रवासादरम्यान अजित पवार यांनी नागरिकांशीदेखील संवाद साधला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button