मुंबई

RBI ने दिला धक्का! ‘या’ बँकांना ठोठावला मोठा दंड; वाचा तपशील

मुंबई : पुन्हा एकदा देशातील सर्वात मोठी बँक आरबीआयने नियमांचे पालन न केल्याबद्दल चार सहकारी बँकांवर मोठा दंड ठोठावला आहे. आरबीआयने मोठी कारवाई करत एक बिहारमधील आणि तीन महाराष्ट्रातील बँकेवर कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरबीआयने ज्या बँकांवर दंड ठोठावला आहे त्यामध्ये इस्लामपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मंगल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि महाबळेश्वर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांचा समावेश आहे.

आरबीआयने जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पाटणाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आरबीआयच्या सूचनांचे पालन करण्यात बँक अपयशी ठरली आहे. त्यानंतर महाबळेश्वर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड महाराष्ट्रला १९४९ च्या तरतुदी आणि केवायसी निर्देशांचे पालन न केल्याबद्दल २ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

महाबळेश्वर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ BR कायदा RBI ने जारी केलेल्या काही निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल या बँकेला २ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय आरबीआयने सेंट्रल बँक मुंबईला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

तुमच्या माहितीसाठी जाणुन घ्या आरबीआयने लावलेल्या दंडाचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. दंडाची ही रक्कम थेट बँक खात्यात जमा करावी लागणार आहे. त्याचा ग्राहकांशी काहीही संबंध नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button