मनोरंजन 

सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर’ याने केली एवढी बक्कळ कमाई

मुंबई : वय मॅटर करत नाही हे पुन्हा एकदा रजनीकांत यांनी दाखवून दिलं आहे. सुपरस्टार रजनीकांत यांनी वयाच्या ७२ व्या वर्षीही बॉक्स ऑफिसवर सुनामी आणली आहे. त्यांचा नुकताच प्रदर्शित झालेला तमिळ चित्रपट ‘जेलर’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
करत आहे. हा चित्रपट केवळ तामिळच नाही तर हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे. आता रजनीकांतच्या ‘जेलर’ चित्रपटाने अवघ्या १० दिवसांत जबरदस्त रेकॉर्ड बनवला आहे.ट्रेड अॅनॅलिस्ट मनोबाला विजयबालन यांनी रजनीकांत यांच्या ‘जेलर’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत नुकतीच एक आकडेवारी शेअर केली आहे. ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी सांगितले आहे की, ‘जेलर’ने १० दिवसांत जगभरात ५१४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

५०० कोटी क्लबमध्ये सामील होणारा रजनीकांतचा हा तिसरा तमिळ चित्रपट ठरला आहे. याआधी ‘पोनियान सेल्वन 1’ (2022) आणि ‘२.० ‘ (२०१८) ने हा विक्रम केला होता. याशिवाय ‘जेलर’ हा दुसरा तमिळ चित्रपट आहे, ज्याने २.० नंतर सर्वात वेगाने ५०० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे.परिणीती चोप्रा ‘या’ दिवशी बांधणार राघव चढ्ढासोबत लग्नगाठ, समोर आली तारीखरजनीकांत यांचा ‘जेलर’ हा चित्रपट १० ऑगस्टला प्रदर्शित झाला होता. पहिल्याच दिवशी रजनीकांतचा जेलर हा चित्रपट सर्व भाषांमध्ये ४८.३५  कोटींची कमाई केली. भारतात या चित्रपटाचे एकूण कलेक्शन २६३.९० कोटी रुपये झाले आहे. दुसऱ्या शुक्रवारी चित्रपटाने १०.०५  कोटींचा गल्ला जमवला आहे. दुसऱ्याच दिवशी चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाली आहे.

शनिवारी ‘जेलर’ने १८ कोटींची कमाई केली आहे. भारतात पहिल्या आठवड्यात चित्रपटाचे एकूण कलेक्शन २३५.८५ कोटी रुपये होते. यामध्ये सर्व भाषांच्या कलेक्शनचा देखील समावेश करण्यात आला आहे.नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित जेलर या सिनेमात रम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, वसंत रवी, शिवा राजकुमार, मोहनलाल आणि जॅकी श्रॉफ सारख्या स्टार्सनी काम केले आहे. या चित्रपटातील ‘तू आ दिलबरा’ हे गाणे सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

हे गाणे तमन्ना भाटिया आणि रजनीकांत यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे.यापूर्वी रजनीकांत ‘दरबार’ या चित्रपटात दिसले होते, ज्यामध्ये त्यांनी प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारासोबत काम केले होते. हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता. एआर मुरुगादास दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. रजनीकांतच्या फीससह ‘दरबार’ २०० कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला होता, मात्र कमाई न झाल्याने निर्मात्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. या चित्रपटात रजनीकांत यांनी २५  वर्षांनंतर पोलिसाची भूमिका साकारली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button