मनोरंजन 

५६ करोड कर्ज वसुलीसाठी सनी देओल चा जुहू मधील बंगल्याची बँकेकडून लिलावाची जाहिरात

मुंबई : अभिनेता सनी देओलचा गदर २ चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत असताना दुसरीकडे सनी देओलने कर्जापोटीच्या ५६ कोटींची परतफेड केली नसल्याची माहिती समोर आली आहे. ५६ कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी बँक ऑफ बडोदाने सनी देओलच्या जुहूतील बंगल्याचा लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार २५ सप्टेंबरला हा लिलाव होणार आहे.

सनी देओलने बँक ऑफ बडोदाकडून कर्ज घेतले होते. जुहू येथील सनी व्हिला नावाचा बंगला त्यासाठी तारण ठेवण्यात आला होता. मात्र या कर्जाची परतफेड सनी देओल यांनी केली नसून ५६ कोटींची रक्कम थकविली आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी अखेर बँकेने सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार ५१ कोटी ४३ लाख रुपये अशी बोली लावण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button