राजकारण

उध्दव ठाकरेंच्या स्टेजवर २०२४ पर्यंत केवळ ४-५ लोकच दिसतील-चंद्रशेखर बावनकुळे

यवतमाळ : पक्ष चालविण्यासाठी २४ तासांतले अठरा तास कामकरावे लागते. उद्धव ठाकरे  यांच्याकडे पक्ष चालविण्याची क्षमता नाही. इतके लोक त्यांना सोडून गेले, त्यावेळी ते काही करू शकले नाही. इथूनपुढे जे सोडून जातील त्यांना देखील थांबवण्याची क्षमता ठाकरेंकडे नाही. बाळासाहेबांनी खूप मेहनतीने वाढवलेल्यापक्षाची उद्धव ठाकरेंनी पार वाट लावली. त्यामुळे २०२४ पर्यंत उद्धव ठाकरे यांच्या स्टेजवर चार-पाचच लोक दिसतील, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ते यवतमाळयेथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातील २८ लोकसभा मतदारसंघांमध्ये मी प्रवास सुरू केला आहे. आज यवतमाळ आहे, उद्या अमरावती, परवा भंडारा जिल्ह्यात प्रवास करणार.सप्टेंबरच्या १५ तारखेपर्यंत हा प्रवास सुरू असेल.

प्रत्येक लोकसभा क्षेत्रात ६०० सक्रिय पदाधिकारी पुढचे दोन महिने प्रवास करणार आहेत. मी स्वतः ‘घर चलो अभियान’करतो आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील तीस हजार कार्यकर्ते ४८लोकसभा क्षेत्रात तीन तास १३ महिने प्रवासाला निघतील. मोदींनी नऊ वर्षात केलेल्या कामाची शिदोरी आमच्याकडे आहे. आम्ही लोकांना कामाचे पत्र देतो तेव्हा मतदार आम्हीमोदींनाच मत देऊ हे ठासून सांगतो, याचा आम्हाला अभिमान आहे, असे ते म्हणाले. मोदींच्या नेतृत्वात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या देखरेखी खाली ४५ लोकसभेच्या जागा जिंकण्याचे टार्गेट पूर्ण होईल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button