राज्य सरकारने घेतला हा मोठा निर्णय; राज्यातल्या ७५ हजार गोविंदांना शासकीय विमा कवच

मुंबई : दहीहंडीचा उत्सव जवळ येतो आहे. त्याच अनुषंगाने राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. गोविंदांच्या विम्यासाठी १८ लाख ७५ हजारांची रक्कम शिंदे फडणवीस सरकारने मंजूर केली आहे. ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत शासकीय विमा कवच लागू असणार आहे. गोविंदाबाबत राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त २५ हजार गोविंदाना राज्य सरकारने विमा कवच दिलं आहे. याआधी ५० हजार गोविंदाना शासकीय विमा कवच देण्याचे ठरवले होते. त्यात २५ हजार गोविंदांची भर पडल्याने आता एकूण ७५ हजार गोविंदांना या विम्याचं कवच मिळणार आहे. प्रो गेविंदा या शासकीय दहिहंडीसाठी राज्य सरकारने गोविंदांना दिले शासकीय विमा कवच दिले आहे.
प्रो गोविंदा दहिहंडी दरम्यान गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास अथवा गंभीर जख्मी झाल्यास हे शासकीय विमा कवच गोविंदांना लागू होणार आहे. ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत हा शासकीय विमा कवच लागू राहणार आहे असंही जाहीर करण्यात आलं आहे. ६ सप्टेंबरला जन्माष्टमी आहे. तर ७ सप्टेंबरच्या दिवशी दहीहंडीचा उत्सव रंगणार आहे. त्याच अनुषंगाने हा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
शासकीय आदेश काढून राज्य सरकारने गोविंदांना शासकीय विमा कवच दिले आहे. अतिरिक्त २५ हजार गोविंदाना राज्य सरकारने विमा कवच दिले आहे. याआधी ५० हजार गोविंदाना शासकीय विमा कवच देण्याच्या सरकारने निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर आता ७५ हजार गोविंदाना सरकारने शासकीय विमा कवच दिले आहे.प्रो गेविंदा या शासकीय दहिहंडी करता राज्य सरकारने गोविंदांना शासकीय विमा कवच दिले आहे.



