जीवनशैली

सांधेदुखीचा त्रास जाणवत असेल तर; या काळ्या ड्रायफ्रूटने त्रास होईल कमी

आरोग्य : तुमच्या सांध्यामध्ये सतत दुखतंय अथवा सतत आखडल्यासारखे जाणवत आहेत का? कमी वयातही सांधेदुखीचा त्रास जाणवत असेल तर शरीरात युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्याचा हा परिणाम असू शकतो. युरिक अ‍ॅसिड हे एक शरीरात तयार होणारे टॉक्सिन असून जेवण पचल्यानंतर लिव्हर, आतडी आणि वॅस्क्युलर इंडोथेलियमपासून हे बनते. किडनीद्वारे युरिक अ‍ॅसिड फिल्टर होऊन बाहेर फेकले जाते.

मात्र बरेचदा युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण शरीरात जास्त होते आणि त्याचे खडे होऊन सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. यामुळे हाडांमध्ये अंतर निर्माण होते तसंच सतत गुडघादुखी आणि सांध्यामध्ये त्रास जाणवतो. यासाठी युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात आणणे गरजेचे आहे आणि यासाठी काळ्या मनुकांचा वापर उत्तम ठरतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने दिलेल्या अहवालानुसार याचा युरिक अ‍ॅसिडसाठी चांगल्या प्रमाणात वापर करून घेता येतो. युरिक अ‍ॅसिडसाठी बाजारामध्ये अनेक औषधंही उपलब्ध आहेत. मात्र तुम्हाला घरगुती उपाय करायचा असेल तर त्यासाठी नैसर्गिक पद्धतीचा अवलंब तुम्ही करू शकता. हेल्थ एक्सपर्टच्या सांगण्यानुसार, खाण्यापिण्यात काही विशिष्ट बदल करून तुम्ही युरिक अ‍ॅसिडवर नियंत्रण मिळवू शकता.

यासाठी काळ्या मनुका उपयोगी ठरतात. काळ्या मनुकांमध्ये असणारे कार्ब्स, प्रोटीन, फायबर, साखर, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, लोह आणि विटामिन सी हे अत्यंत उपयोगी ठरते. हाडांच्या मजबूतीसाठी याचा अधिक फायदा मिळतो.

याशिवाय ज्यांना Osteoporosis आजाराचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे वरदान ठरते. यामध्ये High Calcium असून युरिक अ‍ॅसिडचे खडे शरीरामध्ये जमा न होऊ देण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच एका शोधानुसार, काळ्या मनुकांमधील मॅग्नेशियम हाडं कमकुवत होण्यापासून वाचवतात.

युरिक अ‍ॅसिड हे किडनी फिल्टर करते. मात्र याचा सर्वाधिक त्रास किडनीला होतो. त्यामुळे तुम्ही काळ्या मनुकांचे सेवन केल्यास, त्याचा किडनीला अधिक फायदा मिळू शकतो. याच्या सेवनामुळे किडनी अधिक चांगल्या पद्धतीने काम करते. किडनीमधून युरिक अ‍ॅसिड त्वरीत बाहेर पडण्यासाठी मनुकांचा उपयोग होतो. रोज रात्री पाण्यात मनुका भिजवून सकाळी उपाशीपोटी खाल्ल्याने किडनीला फायदा मिळतो.

रात्री १०-१५ काळ्या मनुका तुम्ही १ ग्लास पाण्यात भिजवा. सकाळी उपाशीपोटी दात घासून झाल्यानंतर या सर्व मनुकांचे सेवन करा. यामुळे सांध्यातील युरिक अ‍ॅसिड त्वरीत बाहेर फेकण्यास मदत मिळते. याशिवाय तुम्ही भिजवलेल्या मनुकांचे पाणीही पिऊ शकता. हा उपाय केल्यानंतर सांधेदुखीमध्ये सुधारणा तुम्हाला लवकरच दिसून येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button