‘फुकरे ३’ जोमात तर नानांचा ‘व्हॅक्सीन वॉर’,आणि कंगनाचा ‘चंद्रमुखी २’ कोमात!

वृत्तसंस्था : गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची चर्चा होती. या चित्रपटासमोर विकी कौशलचा ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ आणि शिल्पाचा ‘सुखी’ हा चित्रपट सुपरफ्लॉप गेले. आता जवानची जादू ओसरली असतांना एक दोन नव्हे तर तीन सिनेमे क्लॅश झाले आहेत. ज्यात ‘फुकरे ३’, ‘द व्हॅक्सिन वॉर’ आणि ‘चंद्रमुखी २’ हे सर्व वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचा समावेश आहेत. ‘फुक्रे 3’ हा एक कॉमेडी, ‘द व्हॅक्सिन वॉर’ कोरोना महामारीच्या लसीवर आधारित तर कंगनाचा ‘चंद्रमुखी’ २’ एक हॉरर चित्रपट आहे.
हे तिन्ही चित्रपट २८ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाले आहेत. तर आता कोणत्या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिनही चित्रपटांचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन काही खास राहिलेले नाही. आता ‘फुकरे ३’, ‘द वॅक्सीन वॉर’ आणि ‘चंद्रमुखी २’ चे दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहे.
चंद्रमुखी २ मधून कंगनाने बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर एंट्री केली आहे. कंगनाच्या चाहत्यांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या मात्र त्या काहीशा पुर्ण झालेल्या दिसत नाहीत. चित्रपटाचे दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. सकनिल्कच्या अहवालानुसार, चंद्रमुखी २ ने पहिल्या दिवशी ८.२५ कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने केवळ ४.५० कोटींची कमाई केली आहे. या कमाईसोबत चित्रपटाने एकूण १२.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
विवेक अग्निहोत्री आणि अभिनेते नाना पाटेकर यांचा ‘द व्हॅक्सीन वॉर’ नावाचा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवशी १.३ कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई फारच कमी होती. चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ १.३ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी केवळ ८५ लाखांची कमाई केली आहे.
या दोन्ही सिनेमांवर जड पडला तो ‘फुकरे ३’.पहिल्या दोन चित्रपटांची स्टारकास्ट फुकरे ३ मध्ये दिसत आहे. मात्र अली फजलचा कॅमिओ सर्वांना आवडला आहे. फुकरे ३ मध्ये पुलकित सम्राट, वरुण शर्मा, पंकज त्रिपाठी, मनजोत सिंग आणि रिचा चढ्ढा यांच्या मुख्य भूमिकेत आहेत. दोन्ही दिवसांच्या कमाईचे आकडे लक्षात घेता चित्रपटाने चांगली ओपनिंग दिली आहे. फुकरे ३ ने पहिल्याच दिवशी ८.८२ कोटींची कमाई केली होती. तर दुस-या दिवशी या चित्रपटाने सुमारे ७.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासोबत चित्रपटाची कमाई १६.३२ कोटी रुपये झाली आहे.



