क्रिडाविश्व

स्क्वॉशमध्ये कांस्य पदक; भारताने एशियन गेम्समध्ये रचला इतिहास

वृत्तसंस्था : भारताने एशियन गेम्स २०२३ मध्ये स्क्वॉश मिश्र दुहेरीमध्ये भारतीय जोडीने कांस्य पदक जिंकले. यानंतर भारताची पदकसंख्या ७२ वर पोहचली आहे. भारताने २०१८ मधील जकार्ता येथे झालेल्या एशियन गेम्समध्ये आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक मेडल्स जिंंकण्याचा विक्रम केला होता. आता हे रेकॉर्ड भारताने हागंझू येथील एशियन गेम्समध्ये मोडले आहे. भारताने जकार्ता येथे ७० पदके जिंकली होती.

भारताची स्क्वॉश जोडी अनहत सिंह आणि अभय सिंह यांनी सेमी फायनलमध्ये प्रवेश करत आपले कांस्य पदक निश्चित केले होते. त्या पदकाचा रंग बदलण्यासाठी, रौप्य पदकासाठी त्यांना आज मलेशियाच्या बिनती आणि सयफिकचा पराभव करणे गरजेचे होते.

भारतीय जोडीने आपला पहिला गेम ११-०८ असा जिंकत आघाडी देखील घेतली होती. मात्र मलेशियाच्या जोडीने दुसऱ्या गेममध्ये जोरदार पुनरागमन केले. त्यांनी दुसरा गेम ११-०२ अशा मोठ्या फरकाने जिंकला. त्यानंतर तिसऱ्या गेममध्ये भारतीय जोडीने थोडी झुंज दिली. मात्र मलेशियाने तिसरा गेम देखील ११-०९ असा जिंकत आपले रौप्य पदक निश्चित केले.

भारतीय जोडीला सेमी फायनलमध्ये विजय मिळवता आला नाही. मात्र त्यांनी कांस्य पदकासह भारताची पदकसंख्या ७२ वर नेली. याचबरोबर भारताची महिला बॉक्सर परवीनने देखील ५७ किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button