जीवनशैली

मुलांच्या वाढीसाठी घरातच बनवा कॅल्शियम पावडर; हजारो रुपये वाचतील, मालही अस्सल

आरोग्य : वाढत्या मुलांना कॅल्शियमच्या कमतरतेचा त्रास होत असल्याचे अनेकदा दिसून येते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे लहान मुलांची हाडे कमकुवत होतात त्यामुळे त्यांना चालण्यास त्रास होतो किंवा ते अत्यंत कमकुवत होतात.

कॅल्शियम हे एक खनिज आहे जे मुलांच्या सामान्य वाढ आणि विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. कॅल्शियम हाडांची ताकद, मानसिक कार्यक्षमता, रोगप्रतिकारक शक्तीचे कार्य आणि स्नायूंच्या आकुंचनासाठी देखील आवश्यक आहे. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे, मुलांना हात-पायांमध्ये मुंग्या येणे, हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो आणि दातांचा बाहेरील थर खराब होतो. डॉ. निताशा गुप्ता यांनी सोशल मीडियावर घरगुती प्रोटीन पावडरची रेसिपी शेअर केली आहे. जी ६ वर्षे ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कॅल्शियम पावडर म्हणून उपयुक्त ठरत आहे. ही पावडर कशी बनवायची याची रेसिपी सांगितली असून यामुळे मुलांमध्ये कधीही कॅल्शियमची कमतरता होणार नाही. जाणून घ्या ही पावडर कशी बनवता येते.

मुलांना कॅल्शियमची कमतरता भासू नये म्हणून ही पावडर बनवा. डॉक्टर निताशाच्या म्हणण्यानुसार पावडर बनवण्याची सामुग्री आणि रेसिपी

  • गॅसवर भांड ठेवा आणि त्यात अर्धा चमचा तूप घाला.
  • आता त्यात २५० ग्रॅम मखना टाका आणि हलका तपकिरी होईपर्यंत शिजवा आणि बाहेर काढा.
  • यानंतर पुन्हा थोडे तूप घालून २५ ग्रॅम बदाम घालून तळून घ्या आणि बाहेर काढा.
  • पुढच्या टप्प्यात ५० ग्रॅम पोहे घेऊन तुपात भाजून घ्या.
  • हे तिन्ही पदार्थ एकत्र करून मिश्रण थंड करा.
  • आता तिन्ही बारीक करून बारीक पावडर बनवा. ही पावडर तुम्ही एक महिना ठेवू शकता.
  • बाहेर फिरायला जाताना कोमट दुधात एक चमचा पावडर मिसळून मुलांना देऊ शकता.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button