मनोरंजन 

हायवे मॅन ऑफ इंडियाच्या जीवनावरील ‘गडकरी’ चित्रपट, २७ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित

वृत्तसंस्था : मागच्या काही काळांपासून सिनेसृष्टीत बायोपिक्सना चांगला प्रतिसाद मिळत आहे. विविध खेळाडू, अभिनेते यासेाबतच राजकारण्यांवरील बायोपिकही पसंत केले गेले आहेत. आता आणखी एका लोकप्रिय राजकारण्यावर चित्रपट येत आहे. ते आहेत केंद्रीय मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी.

गडकरींकडे सध्या केंद्रातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांचे मंत्रिपद आहे. याच क्षेत्रात त्यांनी सर्वाधिक काळ काम करून लौकिक मिळवला आहे. आता त्यांच्याच आयुष्यावर ‘गडकरी’ या नावाने चित्रपट येत आहे. गडकरींना ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ या नावानेही ओळखले जाते. देशाच्या विकासासाठी कायम कटिबद्ध असलेल्या गडकरींच्या आयुष्यावरील ‘गडकरी’ चित्रपट २७ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित गडकरी या चित्रपटाचे निर्माते हे अक्षय अनंत देशमुख आहेत. या चित्रपटाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक भुसारींनी सांगितले की, ’केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची राजकीय कारकिर्द उल्लेखनीय आहे. अभ्यासू राजकारणी, प्रभावी वक्ते, कणखर विचारांचा नेता, देशभरात झालेले रस्त्यांचे जाळे या त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे त्यांचे जवळपास सर्व पैलू जनतेला माहिती आहेत. समाजकल्याणाचा ध्यास घेतलेल्या या लोकप्रिय नेत्याचा राजकीय प्रवास लोकांना माहिती असला तरी त्यांचे खासगी आयुष्य व तारुण्यही तितकेच रंजक. म्हणूनच त्यांचा आतापर्यंतचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.’

आता २७ ॲाक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचेही चित्रपटाचे दिग्दर्शिक अनुराग भुसारी यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button