देशविदेशभारत

गहू व तांदूळ स्वस्त होणार….खुल्या बाजार केंद्र सरकारने केली इतक्या लाख मेट्रिक टन गहू व तांदळाची केली विक्री

नवी दिल्ली : खुल्या बाजार विक्री योजनेंतर्गत १५ वा ई-लिलाव ४ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आला. या ई-लिलावामध्ये बोली लावणाऱ्या २२५५ जणांना १.८९ लाख मेट्रीक टन गहू आणि ०.०५ लाख मेट्रीक टन तांदूळ यांची विक्री करण्यात आली.यावेळी देशभरातल्या ४८१ गोदामातील २.०१ लाख मेट्रीक टन गहू आणि २६४ गोदामांतील ४.८७ लाख मेट्रीक टन तांदळाचा लि्लाव पुकारण्यात आला होता.

तांदूळ,गहू आणि गव्हाचे पीठ यांच्या किरकोळ बाजारातील किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी केंद्र सरकारनं घेतलेल्या पुढाकाराचा एक भाग म्हणून गहू आणि तांदूळ यांचे साप्ताहिक लिलाव करण्यात येत आहेत. या ई-लिलावात तांदूळ आणि गहू यांच्या खरेदीत पॅनेलवर असलेले २२४७ खरेदीदार सहभागी झाले होते.

देशभरात सामान्य दर्जाच्या गव्हाची सरासरी विक्री किंमत २ हजार १८५ रुपये ५ पैसे प्रति क्विंटल होती तर राखीव दर २ हजार १५० रुपयेर प्रति क्विंटल होता. शिथिल वैशिष्ट्यांअंतर्गत (युआरएस) असलेल्या गव्हासाठी सरासरी विक्री किंमत २ हजार १९३ रुपये १२ पैसे रुपये प्रति क्विंटल तर राखीव दर २ हजार १२५ रुपये प्रति क्विंटल होता. देशभरात तांदळाची सरासरी विक्री किंमत २ हजार ९३२ रुपये ९१ पैसे प्रति क्विंटल होती तर राखीव दर २ हजार ९३२ रुपये ८३ पैसे प्रति क्विंटल होता.

ई-लिलावाच्या आताच्या फेरीत किरकोळ किमतीमध्ये घट करण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी खरेदीदारांना कमाल १० टनापासून १०० टन गहू तर १० टनापासून १००० टन तांदूळ खरेदीची मुभा आहे. यामुळे छोट्या तसंच खरेदी साखळीत सहभागी झालेल्या परिघावरच्या घटकाना प्रोत्साहन मिळेल आणि त्यामुळे जास्तीत जास्त खरेदीदार पुढे येतील आणि त्यांना त्यांच्या पसंतीच्या गोदामातील हव्या त्या प्रमाणातील धान्यासाठी बोली लावता येईल,

साठेबाजी होऊ नये म्हणून देशांतर्गत खुल्या बाजारातील विक्री योजनेअंतर्गत होणाऱ्या गहू खरेदीपासून व्यापाऱ्यांना दूर ठेवण्यात आले आहे आणि खुल्या बाजारातील विक्री योजनेतील गहू खरेदीदार असलेल्या आणि गव्हावर प्रक्रिया करणाऱ्यांच्या धान्य दळणाऱ्या गिरण्यांवर लक्ष ठेवून त्यांची तपासणी केली जात आहे. देशभरात ४ ऑक्टोंबर पर्यंत अशा १२२९ तपासण्या केल्या गेल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button