जीवनशैली

शिंगाडा-वेट लॉसपासून थायरॉइड नियंत्रणात ठेवते, हे आहेत फायदे आणि खाण्याची योग्य पद्धत

आरोग्य : नवरात्रीच्या उपवासात तुम्ही फराळामध्ये शिंगाडा, शिंगाड्याच्या पीठाचे सेवन केले असेल. पण शिंगाड्याचे महत्त्व केवळ फराळापुरते मर्यादित नाही. शिंगाडामध्ये असलेले प्रथिने, फायबर, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी ६ सारख्या पोषक तत्वांमुळे ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. शिंगाड्याला ‘वॉटर फ्रूट’ असेही म्हणतात. याच्या नियमित सेवनाने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होण्यास मदत होते. तसेच वजन कमी होणे आणि थायरॉईड नियंत्रित ठेवण्यास मदत होते. शिंगाडा खाल्ल्याने आपल्याला कोणते आश्चर्यकारक आरोग्य फायदे मिळतात आणि त्याचे सेवन करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे ते जाणून घेऊया.

थायरॉइडमध्ये फायदेशीर : थायरॉईडच्या समस्येवर शिंगाड्यातील आयोडीन आणि मॅंगनीज हे फायदेशीर मानले जाते. शिंगाड्यामध्येमध्ये असलेले आयोडीन घशाशी संबंधित आजारांपासून बचाव करते. अशा परिस्थितीत जर तुम्ही थायरॉईडचे रुग्ण असाल, तर शिंगाड्याचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

डिहायड्रेशन : शिंगाड्यामध्ये पुरेसे पाणी असते. याचे सेवन केल्याने शरीरातील डिहायड्रेशनची समस्या दूर राहते.

केसांचे आरोग्य : शिंगाड्याचे सेवन केल्याने केसांच्या समस्या दूर होऊन केसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. यामध्ये असलेले लॉरिक अॅसिड केस मजबूत करण्यास मदत करते.

वेट लॉस : जर तुम्ही तुमच्या वाढत्या वजनामुळे हैराण असाल तर शिंगाडा खाणे हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो. यात खूप कमी कॅलरी असतात, जे बेली फॅटी कमी करण्यात मदत करू शकतात. नाश्त्याच्या वेळी तुम्ही याचे सेवन करू शकता.

तणावमुक्ती : शिंगाड्यामध्ये भरपूर अँटी ऑक्सिडंट असतात. याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव देखील कमी होतो. शिंगाड्याचे सेवन केल्याने शरीर सक्रिय राहते आणि चयापचय देखील वेगवान राहते. ज्याच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचे वजन वेगाने कमी होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी कसे करावे शिंगाड्याचे सेवन?

– तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही स्नॅक म्हणून कच्चे शिंगाडे खाऊ शकता.

– वजन कमी करण्यासाठी शिंगाडा सॅलड म्हणूनही खाऊ शकता.

– शिंगाडा उकळून त्याचे सेवन करू शकता.

– वजन कमी करण्यासाठी शिंगाडे वाळवून पीठात मिसळून खाऊ शकता.

टीप : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button