क्रिडाविश्व

गतविजेत्या इंग्लंडला धक्का देत भारत पुन्हा नंबर-१, पुढचं गणित कसं?

वृत्तसंस्था : वर्ल्‍ड कप २०२३ च्या २९ व्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर १०० धावांनी मोठा विजय मिळवला आहे. चार वर्षांपूर्वीच्या वर्ल्‍ड कपमध्ये ब्रिटीशांकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्याबरोबरच भारताने चालू स्पर्धेतील सर्व सहा सामने जिंकले आहेत. याविजयासोबत भारताने उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने गुणतालिकेत एका स्थानाने झेप घेतली आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या स्थानावर ढकलले आहे.

पॉईंट टेबलमधील टॉप-४ संघांवर नजर टाकली तर न्यूझीलंड तिसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानावर आहे. कांगारू आणि किवी या दोन्ही संघांनी सहापैकी चार सामने जिंकले आहेत. दोघेही उपांत्य फेरी गाठण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत. श्रीलंकेने पाचपैकी दोन आणि पाकिस्तानने सहापैकी २ सामने जिंकले आहेत. प्रत्येक संघाला साखळी टप्प्यात एकूण नऊ सामने खेळायचे आहेत. अशा स्थितीत श्रीलंका आणि पाकिस्तानसाठी टॉप-४ चा मार्ग कठीण दिसत आहे. भारताविरुद्धच्या  पराभवानंतर इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. इंग्लंड ५० षटकांच्या वर्ल्‍ड कप स्पर्धेचा गतविजेताही आहे.

वनडे वर्ल्ड कप २०२३ भारतामध्ये सध्या सुरू आहे, यानंतर २०२४ मध्ये टी-२० वर्ल्ड कप आणि २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. या चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन पाकिस्तानमध्ये होणार आहे, यासाठीच्या क्वालिफिकेशन नियमांची आयसीसीकडून घोषणा करण्यात आली आहे. आयोजक असल्यामुळे पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये थेट एण्ट्री मिळाली आहे. या स्पर्धेत ८ टीम सहभागी होणार आहेत, पण वेस्ट इंडिजची टीम चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही दिसणार नाही.

याआधीची चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ साली खेळवली गेली होती. क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार २०२४ ते २०३१ दरम्यान दोन वेळा चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात येणार असल्याचं आयसीसीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. आयोजक पाकिस्तानशिवाय वर्ल्ड कप २०२३ च्या टॉप-७ टीम २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार आहेत, त्यामुळे इंग्लंडच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या खेळण्याबाबतही साशंकता आहे. इंग्लंड सध्या पॉईंट्स टेबलमध्ये १० व्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड कपची लीग स्टेज संपेपर्यंत इंग्लंड टॉप-७ मध्ये आली नाही तर २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी इंग्लंडशिवाय होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button