मनोरंजन 

नाना पाटेकरांनी डोक्यात मारलेल्या तरुणाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘त्यांनी जी वागणूक दिली ती…’

वृत्तसंस्था : बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत येत आहेत. नाना पाटेकर यांच्या जर्नी सिनेमाचं दशाश्वमेध घाट येथं चित्रीकरण सुरु आहे. या चित्रीकरणादरम्यान नानांनी एका चाहत्यांच्या डोक्यात जोरात फटका मारला. ज्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नानांनी त्यामागचं स्पष्टीकरणदेखील दिलं. परंतु, आता नानांनी ज्या मुलाला मारलं त्या मुलाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सध्या सोशल मीडियावर नाना पाटेकरांनी मारलेल्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या तरुणाने नेमकं त्यावेळी काय झालं ते सांगितलं. तसंच नानांनी मागितलेल्या माफीवरही त्याने भाष्य केलं आहे.

“मी गंगा नदीत पोहायला गेलो होतो त्याचवेळी नाना पाटेकर तिथे शुटिंगला आल्याचं मला कळलं. हे ऐकून मला खूप आनंद झाला. माझ्या आवडत्या कलाकारांपैकी ते एक आहेत. त्यामुळे मला त्यांच्यासोबत एक सेल्फी घ्यायचा होता. तिथे असलेल्या गार्ड आणि क्रू मेंबर्सनी मला थांबवायचा प्रयत्न केला. पण, मी इतका उत्साहात होतो की मी कोणाचं ऐकलं नाही”, असं हा तरुण म्हणाला. पुढे तो म्हणतो, “मी फोटो काढण्यासाठी नानांच्या जवळ गेलो. पण, त्यांनी ज्या पद्धतीने वागणूक दिली ती मला फार अपमानास्पद वाटली. त्यानंतर त्यांनी मला पुन्हा बोलावलंदेखील नाही. पण, मी कोणतीही पोलिस तक्रार करणार नाही.”

दरम्यान, या तरुणाला डोक्यात मारतानाचा नानांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांचं स्पष्टीकरण दिलं. आम्ही त्यावेळी रिहर्सल करत होतो. दिग्दर्शकांनी मला हा सीन सुरु करण्यासाठी सांगितला. त्यामुळे मी तो सीन सुरु करणार तितक्यात हा मुलगा आला. तो कोण होता मला माहित नव्हतं. तो आमच्याच क्रू चा भाग असल्याचं मला वाटलं. मी त्याला परत बोलावलं पण तो पळून गेला होता. काही गैरसमजामुळे हा प्रकार घडला आहे. मला त्याची माफी मागायची आहे, असं म्हणत नाना पाटेकरांनी त्यांचं स्पष्टीकरण दिलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button