मनोरंजन 

जाऊ बाई गावात: शहरातल्या ‘या’ ६ मुली जाणार गावात; स्पर्धकांची नाव जाहीर

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या माध्यमातून लोकप्रिय झालेला राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी लवकरच एका नव्या कार्यक्रमात झळकणार आहे. जाऊ बाई गावात या झी मराठीच्या कार्यक्रमात तो झळकणार असून नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो रिलीज झाला आहे.

या प्रोमोमधून या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सहा स्पर्धकांची नाव जाहीर करण्यात आली आहेत.
‘जाऊ बाई गावात’ ह्या नव्या रिऍलिटी शोचा आज आणखी एक उत्सुकता वाढवणारा धमाकेदार प्रोमो प्रदर्शित झालाय. ज्यात हार्दिक जोशीने अजून दोन नवीन स्पर्धकांशी ओळख करून दिली आहे. या शोमध्ये श्रेया म्हात्रे आणि मोनिशा आजगावकर या दोन स्पर्धक सहभागी होणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला त्याचे सहा स्पर्धक मिळाले आहेत.

स्वत:च्याच प्रेमात असलेल्या या मुली गावाला त्यांच्या प्रेमात पडू शकणार का? ‘आता करणार तेव्हा कळणार’. हळू हळू तुमच्यासमोर उलगडतील आणखी एका पेक्षा एक व्यक्तिमत्वाचे स्पर्धक.

स्नेहा भोसले, संस्कृती साळुंखे, रसिका ढोबळे, हेतल पाखरे, म्हात्रे आणि मोनिशा आजगावकर
दरम्यान, प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा हा नवीन रिऍलिटी शो ‘जाऊ बाई गावात’ येत्या ४ डिसेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button