स्वारगेट परिसरात दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई!

पुणे : स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार फैजल उर्फ गट्ट्या करीम शेख (वय-27 रा. इंदिरानगर, गुलटेकडी, पुणे) याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमा यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही ६१ वी कारवाई आहे.
फैजल शेख स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह स्वारगेट परिसरात तलवार, कोयता, चाकु या सारख्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, विनयभंग, दुखापत, खंडणी, दंगा बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर ४ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्यापासून जीवाला व मालमत्तेला नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.



