गुन्हे
पिंपरी शहरात ‘कोयता भाई’ची दहशत

पिंपरी : मी आत्ताच खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातून बाहेर आलो आहे, सर्वांनी मला हप्ता द्यायचा, अशी धमकी देत कोयता हातात घेऊन रस्त्यावरील लोकांच्या अंगावर धावून जाणा-या भाईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पिंपरीगावात घडली. सलमान शेख (वय ३०, रा. काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सुरक्षारक्षक प्रकाश बहादूर शहा (वय २४, रा. पिंपरीगाव) याने पिंपरी ठाण्यात फिर्याद दिली आहे.



