कोरोना परत आलाय, मुंबईत पुन्हा मास्कसक्ती? BMC ने जारी केली नियमावली

मुंबई : कोरोनाची लाट ओसरल्यामुळे सगळं काही सुरळीत सुरू होतं. पण आता कोविड19 JN.1 च्या नवीन स्ट्रेनने भारतासह जगातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातही ठाण्यात पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेनं तातडीने पावलं उचलली आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि मास्क वापरावे, असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.
खळबळ उडवून दिली आहे. कोरोनाचा नवीन प्रकार अत्यंत संसर्गजन्य मानला जात आहे आणि आतापर्यंत त्याची अनेक प्रकरणे देशात नोंदवली गेली आहेत. परिस्थिती पाहून केंद्र सरकार सक्रिय झाले असून त्यांनी सर्व राज्यांना अलर्ट जारी केला आहे. कोविडबाबत सरकारने उच्चस्तरीय बैठक घेतली असून सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
कोविडच्या नव्या व्हेरियंटविषयी मुंबई महापालिका आरोग्य विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी दक्षा शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. JN.1 नावाचा नवा व्हेरियंट आढळला आहे. मात्र हा व्हेरिअंट सौम्य स्वरुपाचा आहे. मुंबई संपूर्णत: सज्ज आहे. बेडस्, औषधे यांचा आढावा घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या गाईडलाईननुसार पुढे काम करणार आहोत, असं शहा यांनी सांगितलं.
तसंच,तसंच, मुंबईत नव्या व्हेरियंटचा एकही रुग्ण नाही. मुंबईत सध्याच्या घडीला १७ कोविड रुग्ण आहे. टेस्टींग करुन नव्या व्हेरियंटचं संक्रमण तपासणार आहोत. शहरात आरटीपीसीआर टेस्ट वाढवणार आहोत. भीती बाळगण्याची गरज नाही. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा आणि मास्कचा वापर करा असं आवाहन शहा यांनी पालिकेच्या वतीने केलं.
JN.1 (BA.2.86.1.1) व्हेरियंट 2023च्या उत्तरार्धात विकसित झाला असून कोरोना व्हायरसच्या (SARS-CoV-2) ‘पिरोला’ (BA.2.86) या व्हेरियंटचा वंशज आहे. BA.2.86 प्रथम ऑगस्ट 2023 मध्ये आढळला होता. तो कोविडच्या ओमीक्रॉन XBB, EG.5.1 आणि HK.3 या वंशांपासून फायलोजेनेटिकदृष्ट्या वेगळा आहे. BA.2.86 हा स्पाइक (5) प्रोटिन्समध्ये 30 पेक्षा जास्त उत्परिवर्तन घडवून आणते. यामुळे त्यात व्यक्तीशी रोगप्रतिकारक शक्ती कमी करण्याची उच्च क्षमता दिसून येते. JN.1 व्हेरियंट डेन्मार्क आणि इस्रायलमध्ये जुलै 2023च्या अखेरीस सर्वात अगोदर आढळला होता.
हे ५ मार्ग तुमचे कोविडच्या JN.1 प्रकारापासून संरक्षण करतील.
– कोविडचे नवीन प्रकार टाळण्यासाठी लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. लग्न किंवा इतर पार्टीत जाणे टाळा आणि लोकांशी हस्तांदोलन करू नका.
– वेळोवेळी साबणाने हात धुवा आणि कोणत्याही गोष्टीला स्पर्श केल्यानंतर सॅनिटायझर वापरा. हे तुम्हाला व्हायरस टाळण्यास मदत करेल.
– बाहेर जाताना मास्क लावा, जेणेकरून व्हायरस तुम्हाला हवेतून संक्रमित करू शकत नाही. जर तुमच्याकडे मास्क नसेल तर तुम्ही बाहेर जाताना रुमाल वापरू शकता.
– कोणत्याही व्यक्तीमध्ये कोविडची लक्षणे आढळल्यास किंवा कोविडची लागण झाली असल्यास, त्याच्या संपर्कात येणे टाळा. तुम्ही संपर्कात आल्यास ताबडतोब स्वतःची चाचणी करा.
– कोविडची लक्षणे दिसू लागल्यास, योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि स्वतःवर उपचार करा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटिबायोटिक्स आणि स्टेरॉईड औषधे घेणे धोकादायक ठरू शकते.



