महाराष्ट्रमुंबई

राज्यात आता मुलांच्या नावापुढे आईचे नाव, त्यानंतर वडिलांचे व आडनाव लागणार!

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.आज पहाटेपासूनच त्यांनी बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी केली. त्यानंतर अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामती तालुक्यातील सरपंच उपसरपंच व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री आदिती तटकरे यांनी आणलेल्या नव्या महिला धोरणाची माहिती दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आधी अजित अनंतराव पवार असं नाव दिलं जायचं, म्हणजे मूल जन्माला आल्यानंतर मुलाचं नाव, फक्त वडिलांच नाव आणि आडनाव असं असायचं. पण आता आपण नवीन निर्णय घेतला आहे. इथून पुढे मुलगा असो किंवा मुलगी, त्यांची नावे ही आधी मुलाचे नाव, आईचं नाव, नंतर वडिलांचे आणि शेवटी आडनाव असे असणार आहे.

मी तर अर्थमंत्री या नात्याने सांगतो, जर तुम्हाला एखादा फ्लॅट घ्यायचा असेल तर पुरुषाला ६ टक्के कर मात्र महिलेच्या नावावर घेतला तर १ टक्का सवलत आहे.५० लाखाचं घर असलं तर ५० हजार रुपये वाचतात. यापुढे महिलांनी पतीला सांगावं की, घर घ्यायचं असेल तर माझ्या नावावर घ्या. पैसे वाचतील असेही अजित पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button