गुन्हे

शिरूर शहरात जबरी चोरीचे गुन्हे करणाऱ्या टोळीला अटक!

शिरूर : शिरूर शहरात जबरी चोरीचा गुन्हा करणाऱ्या दोन आरोपींना पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून आरोपींकडून चोरीचे मोबाईल व दोन गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक शिरूर शहरात चोऱ्यांच्या वाढलेले प्रमाण व घडलेले गुन्हे याबाबत तपास करत होते. शिरूर शहरात रात्रीच्या वेळी लुटमार करणाऱ्या गुन्ह्यांची उकल करत असताना पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटिव्ही पथकाच्या आधारे चोरीच्या गुन्ह्यातील दोन संशयितांना ताब्यात घेतले होते.

यावेळी पोलिसांनी आधिक तपास करत असताना ताब्यात घेतलेल्या शिरीष सोपान जाधव व संतोष मारुती ढोबळे या आरोपींनी चोरीचे गुन्हे केल्याचे पोलिसांना सांगितले. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून चार चोरीचे मोबाईल व दोन गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सहायक फौजदार तुषार पंदारे, पोलिस हवालदार राजू मोमीन, जनार्दन शेळके, अतुल डेरे, योगेश नागरगोजे आदींनी केली आहे. या प्रकरणी पुढील तपास शिरूर पोलिस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button