महाराष्ट्र

चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच येणार राज्य सरकारचे चित्रपट धोरण – अविनाश ढाकणे

पुणे : “देशात अनेक चित्रपट महोत्सव होतात, मात्र पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारखा चित्रपट महोत्सव एकमेव आहे. असे महोत्सव तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत. राज्य सरकार चांगल्या पद्धतीचे चित्रपट धोरण तयार करत असून त्याद्वारे चित्रपट क्षेत्राला प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल.”

अशी माहिती “फिल्म सिटी’चे व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे यांनी दिली. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन ढाकणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ढाकणे म्हणाले, ” पुणे केवळ सांस्कृतिक राजधानीच नव्हे, तर शैक्षणिक व आयटी हब देखील आहे.

डॉ.जब्बार पटेल यांनी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव चांगल्या पद्धतीने पुढे आणला आहे. या महोत्सवात 51 देशांमधून आठशेहून अधिक चित्रपट रसिकांना पाहण्यास मिळणार आहेत. स्थानिक कथांवर आधारित असलेले चित्रपट कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत. चित्रपट क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. त्यानुसार चित्रपट धोरण ही तयार करत आहे. हे धोरण लवकरच मंत्रीमंडळाच्या बैठकीत सादर केले जाणार आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button