महाराष्ट्र

मुंबई ते पुणे, नाशिक, शिर्डी शेअर कॅबच्या भाड्यात होणार वाढ

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने (एमएमआरटीए) नुकत्याच झालेल्या बैठकीत मुंबईहून नाशिक, शिर्डी, पुणे या तीन मार्गांवरील काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि निळ्या-पांढऱ्या वातानुकूलित टॅक्सीच्या भाड्यात सुधारणा करण्यास मान्यता दिली. मुंबईहून नाशिकला जाणाऱ्या वातानुकूलित टॅक्सी प्रवासासाठी जादा १०० रुपये, शिर्डीसाठी जादा २०० रुपये मोजावे लागणार आहेत. तर, मुंबई ते पुणे प्रवासासाठी वातानुकूलित आणि साध्या टॅक्सी प्रवासासाठी प्रवाशांना अतिरिक्त ५० रुपये जादा द्यावे लागणार आहेत.

मुंबई-नाशिक मार्गावरील वातानुकूलित टॅक्सीचे सध्याचे भाडे ४७५ रुपयांवरून ६३५ रुपये होणार आहे. तर, आणि मुंबई-शिर्डी वातानुकूलित टॅक्सीचे सध्याचे भाडे ५७५ रुपयांवरून ८२५ रुपये होणार आहे. मुंबई-पुणे मार्गावरील साध्या टॅक्सीचे भाडे ४५० रुपयांवरून ५०० रुपये आणि वातानुकूलित टॅक्सीचे भाडे ५२५ रुपयांवरून ५७५ रुपये असेल.

टॅक्सी भाड्यात सुधारणा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या खटुआ समितीच्या अहवालानुसार मुंबई टॅक्सी संघटनेने केलेल्या मागण्या लक्षात घेऊन भाडे सुधारण्यास मान्यता देण्यात आली आहे. भाडेवाढ कधी लागू करण्याबाबत तारीख निश्चित करण्यात आली नाही. मात्र पुढील महिन्यापासून सुधारित भाडेवाढ लागू होण्याची शक्यता आहे, असे आरटीओतील सूत्रांनी सांगितले. सुधारित भाडे मुंबईतील दादर येथे असलेल्या त्यांच्या टॅक्सी थांब्यावर ठळकपणे लावण्याचे निर्देश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button