महाराष्ट्र

मेट्रोच्या कंत्राटदारांनी मुंबई महानगरपालिकेचा थकवला ३७५ कोटी रुपये मालमत्ता कर

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मेट्रो रेल्वेची कामे सुरू असून या कामासाठी नेमलेल्या कंत्राटदारांनी मुंबई महानगरपालिकेचा तब्बल ३७५ कोटी रुपये मालमत्ता कर थकवला आहे. थकीत मालमत्ता कर भरावा याकरीता पालिका प्रशासनाने मेट्रोच्या चार कंत्राटदारांना गेल्या आठवड्यात नोटीस बजावली आहे. या कंत्राटदारांबरोबरच आणखी पाच मोठ्या थकबाकीदारांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.

मुंबईत विविध ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत. कास्टींग यार्ड भूखंडाचा मालमत्ता कर भरलेला नसल्यामुळे पालिका प्रशासनाने ही नोटीस बजावला आहे. करारनाम्यानुसार हा मालमत्ता कर भरण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची आहे. मालमत्ता कर न भरणाऱ्या एचसीसी – एमएमसी, मेसर्स सीईसी – आयटीडी, मेसर्स डोगा सोमा आणि मेसर्स एल. ॲण्ड टी. स्टेक या कंत्राटदारांवर महापालिकेने नोटीस बजावली आहे. महापालिकेने १९ मार्च रोजी या नोटीस बजावल्या असून विहीत कालावधीत मालमत्ता कर भरावा म्हणून करनिर्धारण व संकलन विभागाच्या वतीने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. मेट्रोच्या कंत्राटदारांबरोबरच अन्य मोठ्या मालमत्ताधारक थकबाकीदारांनाही पालिका प्रशासनाने नोटीस बजावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button