महाराष्ट्र

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पनवेलमधील साडी विक्रेत्या व्यापाऱ्याची अनोखी शक्कल

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आणि दुकानाची जाहिरात होण्यासाठी पनवेलमधील एका साडी विक्रेत्या व्यापाऱ्याने अनोखी शक्कल लढविली आहे. १३ मे रोजी मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विधानसभा क्षेत्रात मतदान होणार आहे. मतदान करुन पनवेल शहरताली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याशेजारी दुकानात मतदान करुन थेट दुकानात येणाऱ्या पहिल्या ५१ स्त्रियांसाठी ही योजना दुकानदाराने जाहीर केली आहे. महिला मतदारांसह १३ मे रोजी मतदान करुन येणाऱ्या पहिल्या ५१ पुरुष मतदारांसाठी या दुकानदाराने सियाराम कंपनीचे शर्ट व पॅन्टपीस देणार असल्याची जाहीर केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button