महाराष्ट्र

शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांना देवेंद्र फडणवीसांचा इशारा; सीबील मागाल तर एफआयआर दाखल करु

मुंबई : शेतकऱ्यांना सीबीलची अट लागू करु नये. तसेच सीबीलचे कारण दाखवून त्यांना बँकांनी जर कर्ज नाकारले तर ते खपवून घेतले जाणार नसल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. सीबीलचे कारण सांगून बँकांनी कर्ज नाकारले तर त्यांच्यावर एफआयआर दाखल करु असा इशाराही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिला एफआयआर दाखल केल्यावर आमच्याकडे येऊ नका असेही फडणवीस म्हणाले.

कोणत्याही बँकांना शेतकऱ्याला कर्ज नाकारता येणार नसल्याचे फडणवीस म्हणाले.सीबीलचे कारण सांगून शेतकऱ्यांना कर्ज नाकारु नये असेही ते म्हणाले. याबाबतची माहिती सर्व बँकांना द्यावी असेही ते म्हणाले. दरम्यान, शेतकऱ्यांना कर्ज मिळताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही फडणवीस म्हणाले. खरीप पूर्व बैठकीत बियाणे खतांची उपलब्धता याबाबतची चर्चा झाली आहे. शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला पाहिजे, याबाबातचा आढावा आजच्या बैठकीत आम्ही घेतला. खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेतल्याचे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, डीपीए खतांचा वापर कमी झाला पाहिजे आणि नॅनो खतांचा वापर वाढला पाहिजे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला पाहिजे असेही फडणवीस म्हणाले. तसेच रासायनिक खतांचे लिकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button