महाराष्ट्र

बोरिवली पश्चिमेतील ‘अपना फ्रुट मार्केट‌’ ला मनपा ने ठोठावला तीन कोटींचा दंड

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आर/मध्य कार्यालयाने बोरिवली पश्चिमेतील अपना फ्रूट मार्केटला ३.०७ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे, बोरिवली पश्चिमेतील चिकूवाडीजवळील शिंपोली येथे लिंक रोडवर खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर हे फ्रुट मार्केट उभारण्यात आले आहे. गेल्यावर्षी तत्कालिन क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आणि महिला आणि बालविकास खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या आदिती तटकरे यांनी पालिका प्रशासनाला याबाबत कारवाई पत्र पाठवले होते. त्याच पार्श्वभुमिवर पालिका उपायुक्त भाग्यश्री कापसे यांच्या आदेशानंतर २१ जून रोजी आर/मध्य कार्यालयाने भूखंड मालक/कब्जेदाराला ३.०७ रुपये दंड भरण्याची नोटीस बजावली आहे. नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत मालक/कब्जेदाराला दंड भरण्याची सूचना देण्यात आली आहे, जर असे झाले नाही तर पुढील आवश्यक कारवाई सुरू केली जाईल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. ‌

आर/मध्य प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी पुष्टी केली की फळ मार्केटच्या मालक/कब्जेदाराला वसुलीची नोटीस बजावण्यात आली होती. वसुलीची नोटीस जारी करण्यात आली आहे. नोटीसमध्ये नमूद केलेली रक्कम न भरल्यास, ती रक्कम जोडण्यासाठी मूल्यांकन विभागाकडे पाठवली जाईल. २०१६ मध्ये पालिकेकडून फळांचे प्रदर्शन आयोजित करण्यासाठी या भूखंडावर तात्पुरत्या स्वरुपाचे मंडप बांधण्याची परवानगी मागितली होती. परंतू हा मंडप कधीही तोडण्यात आला नाही याठिकाणी फळ विक्रेत्यांनी सात वर्षांहून अधिक काळ त्यांचा व्यवसाय सुरू ठेवला त्यामुळे सात वर्षांहून अधिक काळ चालवलेल्या या मार्केट मुळे पालिकेचा करोडोंचा महसूल बुडाला आहे.

प्लॉटच्या मालक यांनी नोटीसला आव्हान देणार असल्याचे समजते. सहा-सात वर्षांत पालिकेकडून कधीही स्ट्रक्चर्ससाठी कोणतेही शुल्क वसूल करण्यासाठी नोटीस किंवा थकबाकीच्या वसुलीसाठी कोणतेही स्मरणपत्र जारी केले नाही. अचानक, प्रशासन जागे झाले आणि ३.०७ कोटी वसुलीसाठी नोटीस पाठवली. २०१६ मध्ये कोणत्या संरचना अस्तित्वात होत्या हे नागरी संस्थेला कसे कळते? त्यांच्याकडे याचा काही पुरावा आहे का?‌’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला असल्याचे समजते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button