महाराष्ट्र

महापालिकेच्या रुग्णालयाचा प्रताप; डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांनीच खाल्ले रुग्णांचे पैसै

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जिजामाता हॉस्पिटलमध्ये मोठे आर्थिक गैरव्यवहार झाल्याची  माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारात समोर आलेल्या या माहितीनंतर तक्रारदार किरण नढे यांनी रुग्णालय प्रशासन आणि बँक ऑफ बडोदाच्या कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे आता रुग्णालय प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महापालिकेच्या जिजामाता हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून पावती स्वरूपात दररोज लाखो रुपये जमा केले जातात. पण  रुग्णांकडून जमा करण्यात आलेले हे पैसे रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी बँकेत जमाच केले नसल्याचा आरोप तक्रारदार किरण नढे यांनी केला आहे.

पिंपरी चिंवडमध्ये वैद्यकीय सेवा देणारी महापालिकेची आठ रुग्णालये आहेत.  यातील जिजामाता रुग्णालयात दररोज  येणाऱ्या रुग्णांकडून पावती स्वरुपात शुल्क गोळा केले जाते.  दररोज जमा झालेली ही रक्कम  बँक ऑफ बडोदा या बँकेत जमा कला जाते. हे काम दैनंदिन पद्धतीने सुरू असते. मात्र, जिजामाता रुग्णालाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता साळवी आणि डॉ. वैशाली बांगर यांनी रुग्णालायाचे लिपीक आकाश गोसावी आणि  बँकेच्या कर्माचाऱ्यांनी मिळून बँकेत भरण्यात येणाऱ्या रकमेत मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप किरण नढे यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिजामाता हॉस्पिटलकडे तक्रारदार किरण नढे यांनी १ मार्च २०२४  ते ३० एप्रिल २०२४ या दोन महिन्यांच्या कालावधीत बँक्त भरण्यात येणाऱ्या रकमेची माहिती मागवली होती. या दोन महिन्यांच्या कालावधीत रुग्णालायात १८ लाख ६६ हजार ३५६ रुपये इतकी रक्कम जमा झाली होती. पण कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी बँकेत फक्त ८ लाख ८९ हजार ६६५ रुपये इकतीच रक्कम जमा केल्याची माहिती माहिती अधिकारात उघड झाली.  तर उरलेली रक्कम वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी  स्वखर्चासाठी वापल्याचा आरोप किरण नढे यांनी केला आहे.

तक्रारदार किरण नढे यांनी केलेल्या आरोपात तथ्य दिसल्याने महापालिका आयुक्त शेखरसिंह यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत  या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.  तर हा प्रकार फक्त याच रुग्णायात सुरू नसून इतर रुग्णालयातही असे आर्थिक घोटाळे सुरू असल्याचा आरोपही किरण नढे यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button