महाराष्ट्र

ठाणे जिल्हयातील ‘हे’ ठिकाण बनले नवीन HIV हॉटस्पॉट! ९० टक्के वेश्या पॉझिटिव्ह

ठाणे : संपूर्ण जगामध्ये १ डिसेंबरला वर्ल्ड एड्स-डे दिवस साजरा केला जातो. यावेळी जगभरामध्ये HIV व्हायरसपासून बचावाच्या पद्धती आणि आजारांबाबत जागरुकता पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. एकिकडे हा आजार वैद्यकीय क्षेत्रासाठी आव्हान बनला आहे, तर त्याचवेळी जगातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णांना याची लागण होत आहे. याचदरम्यान आता मजुरांचे शहर अशी ओळख असलेल्या केंद्र भिवंडीत एचआयव्ही (HIV) रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. एचआयव्ही नियंत्रणासाठी काम करणाऱ्या सरकारी यंत्रणा लोकांना जागरूक करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप केला जात आहे. शहरातील एचआयव्ही रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. यंत्रमाग कारखान्यांसोबतच शहरात सायझिंग, डाईंग आणि मोती कारखान्यांसह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात गोदामे आहेत. देशातील प्रत्येक प्रांतातील लोक कामाच्या शोधात येथे येतात. यामुळेच भिवंडीला मिनी इंडिया म्हटले जाते.

हे मजूर त्यांच्या कुटुंबापासून दूर हनुमान टेकडी येथील रेड लाइट एरियामध्ये जातात. जे आता एचआयव्ही हॉटस्पॉट बनले आहे. येथील ९० टक्क्यांहून अधिक वेश्या महिला एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याची खळबळजनक माहिती रेड लाईट एरियामध्ये काम करणाऱ्या एका खासगी संस्थेने दिली आहे. येथे अनेक वेळा आजारांनी ग्रस्त महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जाते. जनजागृतीचा अभाव आणि एचआयव्ही नियंत्रण संस्थांचे रेड लाईट क्षेत्राकडे दुर्लक्ष यामुळे शहरात एचआयव्हीचे प्रमाण वाढत आहे. रेड लाइट एरियातील वेश्या महिलांच्या म्हणण्यानुलार, जेव्हा ते सुरक्षितेसाठी (कंडोमची) मागणी करतात तेव्हा त्यांचा छळ केला जातो. एका वेश्या महिलेने सांगितले की, ती गेल्या १० वर्षांपासून एचआयव्हीने ग्रस्त आहे. त्यांनी सांगितले की त्यांना एचआयव्हीबद्दल जागरूक केले जात नाही. त्यांना कोणत्याही प्रकारची मदत दिली जात नाही. अनेक वेश्या महिलांनी सांगितले की त्यांना या व्यवसायातून बाहेर पडून कुठल्यातरी कंपनीत काम करायचे आहे.

शहरातील एआरटी केंद्रांमध्ये २० ते २२ वयोगटातील तरुण आणि ६० ते ६५ वयोगटातील वृद्धांची संख्या अधिक असल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर दर महिन्याला ३० हून अधिक नवीन एचआयव्ही बाधित रुग्ण एआरटी सेंटरमध्ये येतात. सध्या शहरात साडेतीन हजारांहून अधिक एचआयव्ही बाधित रुग्ण आहेत. त्यांच्यावर नियमित उपचार सुरू आहेत, तर इतर एचआयव्ही बाधित रुग्ण इतर प्रांतातील रहिवासी आहेत, शहर सोडून गेले आहेत किंवा त्यांचा मृत्यू झाला आहे. एआरटी सेंटरच्या सूत्रांचे म्हणणे आहे की सरकारच्या जनजागृती करणाऱ्या एजन्सी काम करत नाहीत, त्यामुळे ही संख्या वाढत आहे. त्याचवेळी शहरात एचआयव्ही रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे आयजीएम उपजिल्हा रुग्णालयाने म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button