पुण्यात चाललय तरी काय ? पुन्हा वाढली कोयता गॅंग टोळक्यांची दहशत
कात्रजमध्ये जोडप्याला विनाकारण बेदम मारहाण तर भररस्त्यात मुलावर कोयत्याने सपासप वार

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळत आहे. कोयत्याने हल्ला करणे, लूटमार, सायबर क्राईम अशा प्रकारचे गुन्हे वाढताना दिसून येत आहेत. मात्र गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी पुणे पोलीस देखील मोठ्या प्रमाणात अवशेक पावले उचलताना दिसत आहेत. मात्र वादविवाद, जुनी भांडणे यातून एकमेकांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. मात्र कात्रज परिसरामध्ये एक वेगळाच गुन्हा समोर आला आहे. एका टोळक्याने जोडप्याला विनाकारण मारहाण केल्याची घटना घडली आहे. कात्रज परिसरात सात ते आठ जणांच्या टोळक्याने कोणतेही कारण नसताना दांपत्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. संतोष नगर परिसरात हा प्रकार घडला असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात संतोष नगर येथील तिरुपती कॉलनी येथे राहणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यावरून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना रात्री साडेदहाच्या सुमारास आदर्श कॉलनी येथे रस्त्यावर घडली. तक्रारदार व त्यांची पत्नी या परिसरातून जात होते. तेव्हा सुरुवातीला दोघांनी तक्रारदाराला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. नंतर आणखी पाच जण तिथे आले, त्यांनीही तक्रारदाराला मारहाण केली. आरोपीने लोखंडी फायटरने तक्रारदाराच्या डोक्यात आणि तोंडावर ठोसा मारून जखमी केले. यादरम्यान तक्रारदाराची पत्नी त्यांच्या मदतीसाठी धावून आली असता, दोन आरोपींनी त्यांना देखील मारहाण केली. या घटनेनंतर आंबेगाव पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. मारहाणीचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास करीत आहेत.
तसेच दुसरी घटना, यश घाटे हा हडपसर परिसरातील एका खासगी महाविद्यालयात शिकत होता. तर, आरोपी त्याच्याच परिसरात राहणारे आहेत. त्यांच्यात यापुर्वी वाद झाले होते. एकमेकांकडे पाहण्यावरून हे वाद झालेले होते. त्यावेळी यश याचा भाऊ प्रज्वल याने तो वाद मिटवला देखील होता.या दरम्यान, मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास यश घाटे व त्याचे मित्र आदित्य चव्हाण, रेहान पठाण तसेच श्रेयश शिंदे असे जामा मस्जिदसमोरून रामटेकडी येथून कॉलेजला जात होते. त्यावेळी साहिल शेख व ताहीर पठाण यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून यशला अडवले. तसेच, त्याठिकाणी त्याच्याशी वाद घालत त्याच्यावर कोयत्याने सपासप वारकरून त्याची हत्या केला. भल्या सकाळी घडलेल्या याघटनेने परिसरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर पसार झालेल्या साहिल व ताहीर यांना शोध घेऊन पकडले देखील. पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.



