महाराष्ट्र

FDA चा मोठा दणका! सिया गोयलच्या वडिलांचे दुकान सील

मुंबई : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलचं कुटुंब आता आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अन्न आणि औषध विभागाच्या रडारवर आलं आहे.  अन्न आणि औषध विभागाच्या टीमने  सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर कारवाई केली आहे.  सिया गोयलच्या वडिलांचे पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात दुकान सील करण्यात आलं आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ डाली आहे.

केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलच्या वडिलांचं बी जी गोयल अँड कंपनी असून ते पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात आहे. या दुकानावर एफडीएने धडक कारवाई केली आहे. सिया गोयलच्या वडिलांची बी जी गोयल अँड कंपनी आहे. पण त्यांच्याकडे व्यवसायाचा परवाना नाही आणि दुकानातील माल निकृष्ट दर्जाचा असल्याचं एफडीए आरोप आहे. त्यानंतर एफडीएच्या टीमने  बी जी गोयल अँड कंपनीमध्ये धाड टाकून तपासणी केली. त्यानंतर हळद पावडर, तीळ आणि सोयाबीन चंकचे नमुने जप्त केले. एफडीएने ८ लाख रुपयांचा ४ हजार किलोचा साठा लेबलमधील तुटी आणि भेसळीच्या संशयावरुन जप्त केल्या आहे. आवश्यक तरतुदींचे पालन न केल्यामुळे तसंच सदर संस्थेनं परवान्यामध्ये आवश्यक दुरुस्ती न केल्यामुळे पुढील आदेशापर्यत व्यवसाय बंद करण्याची नोटीस दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button