देशविदेश

अमेरिकन शेअर बाजारातून अदानी एंटरप्राइजेसला हटवलं

 भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांना रोज नवनवीन धक्के बसत आहे. आता अदानी एंटरप्राइजेसला (Adani Enterprises) ला अमेरिकन शेअर बाजार डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्स ( Dow Jones ) मध्ये मोठा झटका बसला आहे.

डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्स ( Dow Jones ) ने S&P इंडेक्समधून अदानी एंटरप्राइजेसला हटवले आहे. डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्स ( Dow Jones ) न्यूयॉर्क शेअर बाजाराला ही माहिती दिली आहे. Dow Jones च्या या निर्णयानंतर भारतात अदानी एंटरप्राइजेसच्या शेअरला लोअर सर्किट लागला. या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. अदानी पॉवरचा शेअरसुद्धा लोअर सर्किटवर आला आहे. अदानी पोर्टमध्ये १०% घसरण झाली आहे.

अदानी ग्रीन एनर्जी व अदानी टोटल गॅसचा शेअरही लोअर सर्किटवर आला आहे. यूएस स्टॉक एक्स्चेंजने अदानी एंटरप्रायझेसला S&P डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. या स्टॉक एक्स्चेंजच्या निवेदनात म्हटले आहे की , S&P डाऊ जोन्स निर्देशांकातून अदानी एंटरप्राइजेस ७ फेब्रुवारी २०२३ पासून Dow Jones सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून काढण्यात येणार आहे.

NSE चा मोठा निर्णय

अदानी ग्रुपच्या शेअर्समधील प्रचंड चढउतार रोखण्याच्या उद्देशाने NSE ने मोठा निर्णय घेतला आहे. NSE ने अदानी पोर्टच्या F&O स्टॉक खरेदीवर बंदी घातली आहे. अदानी पोर्ट आणि एंटरप्रायझेसवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

अदानी एंटरप्राईजेसच्या(Adani Enterprises) एफपीओची चर्चा होती. हिंडनबर्ग अहवालानंतरही अदानी एंटरप्राईजसने एफपीओ (FPO) बाजारात उतरवला होता. ३१ जानेवारी २०२३ पर्यंत त्याची मुदत होती. याकाळात गुंतवणूकदारांनी त्याला प्रतिसाद ही दिला. कंपनीने २०,००० कोटी रुपयांचा एफपीओ आणला होता. या एफपीओचे सब्सक्रिप्शन झाल्यानंतरही कंपनीने तो रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. गुंतवणूकदारांचे (Investors) आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button