गुन्हे

अमिताभ बच्चन यांच्या घरासमोर बॉम्ब; फोन करणाऱ्यास अटक

मुंबई : मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बाँब ठेवल्याचे फोनवरून पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनीही फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास चालू केले.

त्यानंतर काही काळातच मुंबईत बॉम्बस्फोट होणार अशा माहितीचा फोन करणाऱ्या व्यक्तीला पालघर, डहाणूमधून अटक करण्यात आली. या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव अश्विन महिसकर असल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबईमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती अश्विन महिसकर यांनी दिली होती असं आता पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा, डिगडोह येथील रहिवासी आहे. त्याची आता माहिती घेण्याचे काम पोलीस करत असून या प्रकरणामध्ये आणखी कोणाचा यामध्ये समावेश आहे का त्याचा तपास पोलीस करत आहेत. मुंबईतील नलबाजार, मेहंदी बाजार आणि जेजे हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची नागपूर पोलीस कंट्रोल रूममध्ये माहिती देण्यात आली होती. त्यानंतर तपासाची सूत्रे गतिमान करून या प्रकरणातील संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून या प्रकरणाची माहिती मिळाली असली तरी त्याचा आणखी कोणत्या गुन्ह्यात समावेश आहे का त्याचा शोध पोलीस करत आहेत.

ज्या प्रकारे मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचे पोलिसांना सांगण्यात आले होते. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध अभिनेते महानायक अमिताभ बच्चन, मुकेश अंबानी आणि धर्मेंद्र यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवण्यात आली होती. त्यावेळी मोठी खळबळ उडाली होती. ही माहितीही नागपूर पोलिसांनी फोन करूनच देण्यात आली होती.

नागपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून त्यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती मुंबई पोलिसांना देऊन या प्रकरणाचा तपास करुन संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button