गुन्हे

शरीरसंबंध ठेवून एक हजार रुपयांची मागणी करताच रिक्षा चालकाने केली महिलेची हत्या!

नवी मुंबई गुन्हे वार्ता : नवी मुंबईतील महापे-शिळफाटा येथील अडवली भुतवली गावालगतच्या जंगलामध्ये महिलेचा मृतदेह २२ मार्च रोजी आढळला होता. नवी मुंबई पोलिसांना या हत्येचा उलगडा करण्यास यश मिळाले आहे. एक हजार रुपयांची मागणी केल्याने ही हत्या करण्यात आली असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका रिक्षा चालकाला अटक केली आहे.

२२ मार्च रोजी घडलेल्या महिलेच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी मोहम्मद अहमद मोहम्मद अली साईन (वय ३६) या रिक्षा चालकाला अटक केली आहे. आरोपी रिक्षा चालकाने मृत महिलेसोबत शरीर संबध ठेवले होते. त्यानंतर महिलेने आरोपीकडे एक हजार रुपयांची मागणी केली. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. या वादातून रिक्षा चालकाने महिलेच्या डोक्यात सिमेंट काँक्रीटचा दगड घालून तिची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

जंगलात महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील संपूर्ण सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच संशयित वाहनांच्या नोंदी घेऊन त्यांची छाननी सुरू केली. त्यातून एका रिक्षामधून एक महिला व रिक्षा चालक हे दोघेही अडवली भुतवली येथील गावदेवी मंदिराकडे जात असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी रिक्षा चालकाचा शोध सुरू केला. त्यानंतर रिक्षा चालकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली. अखेर पोलिसांच्या तपासात त्याने आपला गुन्हा कबुल केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button