जगातील चौथी मोठी ‘हि’ बॅंक आता भारतात; लोकसंख्या आहे जर्मनीहून अधिक

नवी दिल्ली : हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एचडीएफसी बॅंक यांच्या विलीनीकरणानंतर ही बॅंक जगातील चौथी सगळ्यात मोठी बॅंक ठरली आहे. या बॅंकेची टक्कर आता अमेरिका, चीन आणि जपानच्या बॅंकांना मिळणार आहे.
त्यामुळे भारताचा दबदबा जागतिक बाजारपेठेत वाढणार आहे. एचडीएफसी ट्वीन्सच्या विलीनीकरणाच्या चर्चेने शेअरबाजारात उसळी आली. एचडीएफसी लि. आणि एचडीएफसी बॅंक यांच्या एकत्र येण्यामुळे एकत्रित बाजारमूल्य पाहता या बॅंकेने टाटा समुहाच्या टीसीएसला मागे टाकले असून रिलायन्स इंडस्ट्रीनंतर ती देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे.
जगात जेव्हा सर्वात मोठ्या बॅंकेची चर्चा होते तेव्हा अमेरिका, चीन आणि युरोपीय बॅंकांकडे पाहीले जात होते. परंतू आता भारताची बॅंक या स्पर्धेत उतरली आहे. जगातील ताकदवान बॅंकात आता भारतीय बॅंकेचे नाव घेतले जाणार आहे. एचडीएफसी लि. आणि एचडीएफसी बॅंकेच्या विलीनीकरणातून तयार झालेली एचडीएफसी बॅंक ही जगातील सर्वात जास्त बाजारमू्ल्य असलेल्या बॅंकेत तिचे नाव सामील झाले आहे. त्यामुळे चीन अमेरिकेच्या टॉप बॅंकांना आव्हान मिळणार आहे.
जगात सगळ्यात मोठ्या बॅंकात जेपी मॉर्गन चेस एण्ड कंपनी, इंडस्ट्रीयल एण्ड कमर्शियल बॅंक ऑफ चायना लिमिटेड आणि बॅंक ऑफ अमेरिका कॉर्प या बॅंकांचा दबदबा आहे. ब्लूमबर्गच्या आकड्यानूसार एचडीएफसी बॅंक व्हॅल्यूएशन १७२ अब्ज डॉलर असावे, जगातीस सर्वात मोठी बॅंक जेपी मॉर्गन चेस एण्ड कंपनीची व्हॅल्यूएशन ४१६.५ अब्ज डॉलर आहे. त्यानंतर आयसीबीसीचे २२८.३ अब्ज डॉलर आहे. तर बॅंक ऑफ अमेरिकाचे २२७.७ अब्ज डॉलर इतके आहे. म्हणजे एचडीएफसी जगातील चौथी मोठी बॅंक ठरणार आहे.
एचडीएफसी लि. आणि एचडीएफसी बॅंकेच्या एकत्रीकरणातून जी बॅंक तयार झाली आहे. तिचे एकत्रित बाजारमू्ल्य १४,२२,६५२.५७ कोटी इतके झाले आहे. टीसीएसचे बाजारमू्ल्य १३,७३,८८२.३१ कोटीच्या पुढे आहे, म्हणजे टाटांच्या टीसीएसला एचडीएफसीने मागे टाकले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांची देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीचे बाजारमूल्य सध्या १७,९५,५०६.१५ कोटी रुपये इतके आहे. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर आता एचडीएफसी भारतातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे.
मर्जरनंतर एचडीएफसीच्या शेअर डीलिस्टींग १३ जुलैपासून होणार आहे. हाऊसिंग फायनान्स कंपनीचे शेअर या दिवसापासून स्टॉक एक्सचेंजमधून हटणार आहेत. संयुक्त कंपनीचे शेअर १७ जुलैपासून ट्रेंड होतील, मर्जरमुळे एचडीएफसीला एचडीएफसी बॅंकेत ४१ टक्के भागीदारी मिळेल. एचडीएफसी बॅंक आणि एचडीएफसीच्या मर्जरनंतर कंपनी मार्केट कॅपमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर ही बॅंक देशातील दुसरी मोठी कंपनी बनणार आहे.
एचडीएफसी बॅंकेच्या मर्जर नंतर तिच्या ग्राहकांची संख्या १२ कोटी इतकी होणार आहे. जर्मनीच्या लोकसंख्याहून अधिक ही संख्या आहे. मर्जरमुळे बॅंकेचे ब्रांच नेटवर्क ८,३०० हून अधिक होणार आहे. तर एकूण कर्मचाऱ्यांची संख्या १,७७,००० हून अधिक होणार आहे.



