महाराष्ट्र

मनसे सिन्नर टोलनाका तोडफोडीप्रकरणी पोलीसांची कारवाई ८ जणांना केली अटक

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असतांना अमित ठाकरे यांची गाडी ही सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर अडवली होती. यावेळी टोलनाका कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी हुज्जत घातल्याने मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावर राडा घालत तोडफोड केली होती. समृद्धी टोल प्रशासनाच्या वतीने या प्रकरणी तक्रार दिल्यावर १५ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यातील काही जणांना चौकशीसाठी बोलवल्यावर ८ जणांना वावी पोलिसांनी अटक केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे गेल्या चार, पाच दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. अमित ठाकरे यांच्या या दौऱ्यादरम्यान ते शनिवारी रात्री सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर आले असता त्यांना या ठिकाणी अर्धा तास वाट पाहावी लागली. तसेच टोल कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी उद्धटपणे वर्तन केल्याने मोठा राडा झाला. टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांनी अमित ठाकरे यांची कार अडवली.

त्यानंतर मनसेच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी टोल नाक्याची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. या तोडफोडीमध्ये जवळपास पाच लाखांचं नुकसान झाल्याचा दावा समृद्धी टोल प्रशासनाने केला होता. या प्रकरणी टोल प्रशासाने येथील वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तक्रार दाखल करून घेत १५ अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला होता. यातील १४ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यापैकी आता आठ जणांना आता अटक करण्यात आली आहे.

या घटनेसंदर्भात अमित ठाकरे म्हणाले होते की, शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेऊन आम्ही नाशिकच्या दिशेने निघालो. समृद्धी महामार्गावरून जात असताना सिन्नर येथील टोलनाक्यावर कार थांबवण्यात आली. कारला फास्टटॅग असतानाही टोलनाक्यावरील फाटक उचलण्यात आले नाही. याबाबत कार्यकर्त्यांनी मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना कारण विचारले. त्यावर तांत्रिक कारण असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. परंतु, मॅनेजरसह कर्मचाऱ्याने उद्धट भाषेत वापरली. काही वेळानंतर कार सोडण्यात आली. पण, हॉटेल पोहचल्यानंतर टोकनाक्याची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button