मनोरंजन 

पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांचा ‘पुण्यभूषण’ पुरस्काराने सन्मान!

नुकताच पुण्यात ‘पुण्यभूषण’ पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना ‘पुण्यभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे दर वर्षी हा मानाचा पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा हा पुरस्कार आपल्या दमदार अभिनयाने मराठीच नव्हे, हिंदी नाट्य-चित्रपट क्षेत्रात दबदबा निर्माण करणाऱ्या डॉ. मोहन आगाशे यांना प्रदान करण्यात आला. बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर आणि अभिनेत्री श्रमिला टागोर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘पुण्यभूषण’ पुरस्कार स्वीकारल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘पुण्यात आज माझा हा सन्मान होत आहे याचाकज मला अधिक आनंद आहे. या शहराने मला खूप सांभाळून घेतले आहे. हा पुण्यभूषण पुरस्कार माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. मी म्हणेन की यासाठी मी एकट्याने काहीच केलेले नाही, जे काही केले ते माझ्यासोबत अनेकांनी मिळून केले. त्यामुळे हा पुरस्कार माझ्या एकट्यासाठी नाहीये. माझ्या वैद्यकीय पेशाने मला वेगळा विचार करायला शिकवलं. तर, अभिनय क्षेत्राने माणूस म्हणून जगायला शिकवलं. आयुष्यात समतोल राखण्यासाठी याची मदत झाली.’

यावेळी अनुपम खेर यांनी देखील डॉ. मोहन आगाशे यांचं कौतुक केलं. डॉ. मोहन आगाशे यांच्या कारकीर्दीच कौतुक करताना अनुपम खेर म्हणाले की, ‘आजघडीला या ओटीटी विश्वात लोकप्रिय होणं खूप सोपं आणे. पण, कलाकार म्हणून आदर मिळवणं फार कठीण आहे. मात्र, डॉ. मोहन आगाशे यांनी आपल्या दमदार अभिनयाने तो आदर कमावला आहे. जेव्हा मी पहिल्यांदा घाशीराम कोतवाल हे नाटक पाहिलं, तेव्हापासूनच मी त्यांचा चाहता झालो. पण, मनातल्या मनात माझी त्यांच्याशी स्पर्धा देखील सुरू होती.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button