जीवनशैली

कलाकंद बनविण्याची रेसिपी केवळ ४ गोष्टींपासून बनवा झटपट तयार

अधिक श्रावण सुरु झाला असून अनेक लोक सोमवारचे व्रत करतात. यात भोलेनाथला नैवेद्य अर्पण करण्यासाठी तसेच उपवासासाठी वेगवेगळ्या मीठाई बनवल्या जातात. तुम्ही सुद्धा काही बनवण्याचा विचार करत असाल तर ही रेसिपी ट्राय करू शकता. श्रावणाच्या पहिल्या सोमवारी तुम्ही कलाकंद करू शकता. येथे जाणून घ्या ४ गोष्टींपासून कलाकंद कसा बनवायचा.

कलाकंद बनवण्यासाठी साहित्य
हे बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे…

– मिल्क पावडर

– कंडेन्स्ड मिल्क

– पनीर

– पिस्ता

कसे बनवावे

कलाकंद बनवण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये मिल्क पावडर आणि कंडेन्स्ड मिल्क घाला. नंतर ते चांगले मिक्स करा. आता त्यात पनीरचे तुकडे पण टाका. हे सर्व चांगले मिक्स करा. साधारण १५ ते २० मिनिटांत हे घट्ट होण्यास सुरवात होईल. थोडी ओली कंसिस्टेंसी असेल तेव्हा गॅस बंद करा. आता हे एका भांड्यात काढा. त्यावर थोडे चिरलेले पिस्ते घालून फ्रीजमध्ये ठेवा. काही वेळाने ते सेट झाल्यावर त्याचे तुकडे करा. तुमचे टेस्टी कलाकंद तयार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button