मनोरंजन 

हास्य जत्रा फेम निखिल बनेचा वाढदिवस स्नेहल शिदमकडून प्रेमाचा वर्षाव

मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो प्रेक्षकांना नेहमीच खूप आवडतो. या शोमधील विनोदांनी लोकांचा दिवसभराचा थकवा नाहीसा होता. त्यामुळे या शोला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळते. या शोमधील प्रत्येक कलाकार सध्या खूप चर्चेत आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रामधील निखिल बने याच शोमुळे नावारुपास आला. आता त्याचा स्वतंत्र असा चाहतावर्ग आहे. निखिलचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. त्याच्या वाढदिवसाला अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या. त्याच्यासाठी पोस्ट शेअर केल्या. चाहत्यांसुद्धा त्याच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला. पण या सगळ्यात एक कमेंट लक्षवेधी ठरली. ती होती चला हवा येऊ द्या फेम स्नेहल शिदमची.

अभिनेत्री स्नेहल शिदमने आपल्या इन्स्टाग्राम हॅण्डलवर निखिल बनेसोबतचा एक फोटो सेअर केला होता. त्यावर तिने “बनू डार्लिंग हॅपी बर्थडे. देव तुझ्यावर अशीच कृपादृष्टी ठेवो. लव्ह यू बेबी”, असे लिहिले होते. तर निखिलने सुद्धा आपल्या अकाउंटला स्नेहलची ही पोस्ट रिशेअर करत थॅंक्यू डार्लिंग, लव्ह यू असे लिहिले होते. याशिवाय सोबत शेअर केलेल्या इमोजींनीसुद्धा सर्वांचे लक्ष वेधले.

यापूर्वीही महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधील अभिनेत्री वनिता खरातच्या लग्नावेळी स्नेहल आणि निखिलचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यावेळी दोघांच्या चर्चेला उधाण आले होते. कारण त्या फोटोत निखिल आणि स्नेहलने एकमेकांच्या हातात हात धरुन पोज दिली होती. आणि सोबत कॅप्शनमध्ये “पिरतीच्या फडात गं…धरला हात असा…काळीज येंधलं आरल …” असं कॅप्शन दिलं होतं. आणि अशातच आता स्नेहलने निखिलच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या पोस्टमुळे या चर्चांना आणखी उधाण आले आहे. त्यांचे चाहतेही त्यांच्यात नक्की काय चालू आहे हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button