गुन्हे

मुंबईतील भर रस्त्यात जुन्या वादावरुन १८ वर्षीय तरुणाची धारधार शस्त्राने हत्या

मुंबई : गोवंडीतून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गोवंडीत एका अठरा वर्षाच्या तरुणाची भर रस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आली. मोहम्मद सईद पठाण या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मोहम्मद हा शिवाजीनगर परिसरातून जात होता. त्यावेळी ३ अल्पवयीन मुलांनी त्याला गाठलं. त्यांनी जुनं भांडण उकरून काढली. एका मुलाने मोहम्मदच्या पाठीवर वार केला. त्यानंतर दुसऱ्याने कंबरेवर वार केला. या हल्ल्यात मोहम्मद रस्त्यावरच पडला. या घटनेत रक्तबंबाळ झालेल्या अहमदला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्याला मृत घोषित केले.

१८ वर्षाच्या तरुणाची हत्या केल्याप्रकरणी ३ अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या तिन्ही मुलांना बालसुधारगृहात पाठविण्यात आलं आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीने घटनेनंतर पळून गेला आहे. पोलीस त्याच्या शोधावर आहे. मोहम्मद सईद पठाण हा गोवंडीच्या शिवाजीनगरमध्ये कुटुंबीयांसोबत राहतो. त्या हत्या प्रकरणातील आरोपी देखील याच परिसरात राहतात. सर्व जण एकमेकांच्या परिचयाचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद सुरु होते. दरम्यान मोहम्मदच्या मृत्यूनंतर शिवाजीनगर पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलीस आता मुख्य आरोपीच्या शोधात आहे. ही थरकाप उडवणारी हत्याचे दृष्ये मोबाइल कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. या हत्येच्या घटनेने शिवाजीनगर परिसरात खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button