गुन्हे

शिरुर तालुक्यात अज्ञात व्यक्तीने गव्हाच्या पेंढया पेटवून केले शेतकऱ्याचे नुकसान

पुणे ग्रामीण  गुन्हे वार्ता : कवठे येमाई (ता. शिरूर) येथील शेतकरी दत्तात्रय आप्पा पोखरकर यांनी त्यांच्या शेतातील कापणीला आलेले गव्हाचे पिक कापून मळणी करण्यासाठी गव्हाचे पेंढे एका जागेवर ठेवले होते. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याला आग लावून शेतकऱ्याचे ६० हजार रूपयांचे आर्थिक नुकसान केले आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. १९) फेबुवारी रोजी रात्री ११.३० वाजल्याच्या सुमारास कवठे येमाई गावातील शेतजमीन गट नं. ६३१ मध्ये दत्तात्रय पोखरकर यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये कापणीला आलेले १ एकर गव्हाचे पिक कापुन मळणीसाठी त्याच्या पेंढया बांधुन एका जागेवर जमा करून ठेवल्या होत्या.

कोणीतरी अज्ञात व्यक्तीने नुकसान करण्याचे उद्देशाने त्या गव्हाच्या जमा करून ठेवलेल्या पेंढया पेटवुन देवुन त्यांच्या गव्हाचे सुमारे ६०,०००/- रू. चे नुकसान केले आहे म्हणून त्यांनी अज्ञात व्यक्तीविरूध्द शिरूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस पोलिस हवालदार अनिल आगलावे हे करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button